हाँगकाँगमध्ये तणाव; निदर्शकांवर प्लास्टिक गोळ्यांचा मारा

By admin | Published: October 3, 2014 02:56 AM2014-10-03T02:56:05+5:302014-10-03T02:56:05+5:30

सरकारी निवासस्थानांना येथे लोकशाहीवाद्यांनी घातलेला घेराव हटविण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी अश्रुधूर व प्लास्टिक गोळ्य़ांचा वापर केला. परिणामी तणाव कायम राहिला.

Stress in Hong Kong; The plastic balls on the demonstrators hit | हाँगकाँगमध्ये तणाव; निदर्शकांवर प्लास्टिक गोळ्यांचा मारा

हाँगकाँगमध्ये तणाव; निदर्शकांवर प्लास्टिक गोळ्यांचा मारा

Next
>हाँगकाँग : सरकारी निवासस्थानांना येथे लोकशाहीवाद्यांनी घातलेला घेराव हटविण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी अश्रुधूर व प्लास्टिक गोळ्य़ांचा वापर केला. परिणामी तणाव कायम राहिला. अधिका:यांनी लोकशाहीवादी गटांनीहा वेढा होईल तेवढय़ा लवकर काढावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. निदर्शकांनी विधिमंडळ इमारतीसमोर धरणो आंदोलन सुरू करून मुख्य कार्यकारी अधिकारी लेयुंग चून-यिंग यांना गुरुवारी रात्रीर्पयत राजीनामा देण्याची मुदत दिली आहे. चीन सरकारने चून यिंग यांच्या पाठीशी ठामपणो आम्ही उभे असल्याचे सांगितले. चीनच्या अंतर्गत प्रश्नांत अमेरिकेने हस्तक्षेप करू नये असा कडक इशारा चीनने दिला आहे. (वृत्तसंस्था)
 
लोकशाहीवाद्यांना ‘कल्पनातीत परिणामांचा’ इशारा
4बीजिंग : लोकशाहीवाद्यांनी हाँगकाँगमध्ये त्यांची निदर्शने सुरूच ठेवली, तर ‘कल्पनातीत परिणामांना’ तोंड द्यावे लागेल, असा इशारा चीनच्या पीपल्स कम्युनिस्ट पक्षाने दिला आहे.
4लोकशाहीची मागणी करणा:यांनी हाँगकाँग शहराचे मुख्य कार्यकारी अधिकारी ल्युंग चून-यिंग यांनी गुरुवार्पयत राजीनामा दिला नाही, तर सर्व सरकारी इमारतींचा ताबा घेण्याचा इशारा दिल्यानंतर चीन सरकारचा संयम संपत येऊन चीनचे सरकारी दैनिक ‘पीपल्स डेली’ने वरील धमकी दिली. 
4हाँगकाँगमध्ये सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन पीपल्स डेलीच्या संपादकीयात करण्यात आले आहे. ‘एक देश दोन व्यवस्था’ या तथाकथित कराराला चीन सुरुंग लावत  असल्याचा आरोप हाँगकाँगचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड पॅटन यांनी केला आहे. 1997 मध्ये हाँगकाँग चीनला परत करण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनाचा चीन भंग करीत आहे, असा आरोप पॅटन यांनी केला. 

Web Title: Stress in Hong Kong; The plastic balls on the demonstrators hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.