‘डब्ल्यूएचओ’शी संबंध तोडून अमेरिकेचे चीनवरही कडक निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 04:55 AM2020-05-31T04:55:14+5:302020-05-31T04:55:51+5:30

धमकी प्रत्यक्षात उतरविली। ट्रम्प यांची दोघांवरही आगपाखड

Strict US sanctions on China, severing ties with the WHO | ‘डब्ल्यूएचओ’शी संबंध तोडून अमेरिकेचे चीनवरही कडक निर्बंध

‘डब्ल्यूएचओ’शी संबंध तोडून अमेरिकेचे चीनवरही कडक निर्बंध

Next

वॉशिंग्टन : जागतिक आरोग्य संघटनेशी (डब्ल्यूएचओ) अमेरिका पूर्णपणे संबंध तोडत असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. अमेरिका इतकी वर्षे जी रक्कम (दरवर्षी ४५० दशलक्ष डॉलर) ‘डब्ल्यूएचओ’ला देत होती ती आता अन्य संघटनांच्या माध्यमातून जगातील गरजू देशांना दिली जाईल, असेही ट्रम्प म्हणाले.


कोरोना विषाणूची साथ चीनने जगभर पसरविली आणि ‘डब्ल्यूएचओ’ कळसूत्री बाहुले असल्याप्रमाणे चीनच्या तालावर नाचत राहिली, असा पुन्हा एकदा आरोप करीत ट्रम्प यांनी चीनला वठणीवर आणण्यासाठी त्या देशाविरुद्ध नवे कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याचेही जाहीर केले.


ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या रोझगार्डनमध्ये पत्रकारांसमोर ‘डब्ल्यूएचओ’ व चीन यांच्यावर आगपाखड करणारे आपले निवेदन फक्त वाचून दाखविले. मात्र, पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचे त्यांनी उत्तर दिले नाही.
ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेकडून ‘डब्ल्यूएचओ’ला दिला जाणारा निधी स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते.
नंतर दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी या जागतिक संघटनेच्या महासचिवांना पत्र लिहून चीनची भलामण करणे बंद केले नाही व कारभारात सुधारणा केली नाही, तर अमेरिका या संघटनेतून कायमची बाहेर पडेल, असे सांगितले होते. त्यासाठी ट्रम्प यांनी एक महिन्याचा अवधी दिला होता. मात्र, त्याआधीच त्यांनी आपली धमकी प्रत्यक्षात उतरविली. (वृत्तसंस्था)

ट्रम्प म्हणाले, चीनला अनेक
प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील!

च्कोरोनाची साथ जगभर पसरविण्याखेरीज ट्रम्प यांनी चीनवर इतरही आरोप केले. त्यात व्यापारातील सवलतींचा गैरफायदा घेऊन अमेरिकेस लुबाडणे, हाँगकाँगच्या बाबतीत जागतिक वचनांचा भंग करणे व दक्षिण चीन समुद्रातील अनेक टापू बेकायदा बळकावून व आक्रमक पवित्रा घेऊन व्यापारी मार्गाची सुरक्षितता धोक्यात आणणे इत्यादींचा समावेश होता.
च्केवळ अमेरिकेलाच नव्हे, तर संपूर्ण जगाला चीनला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, असे सांगून ट्रम्प म्हणाले की, अमेरिका आपल्या राष्ट्रहिताची जपणूक करण्यासाठी ज्यांच्यापासून सुरक्षेस धोका पोहोचू शकेल, अशा चीन नागरिकांच्या अमेरिका प्रवेशावर बंदी घालेल व चीनच्या अमेरिकेतील गुंतवणुकीवरही कडक निर्बंध लागू करील.

Web Title: Strict US sanctions on China, severing ties with the WHO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.