फाटकी जीन्स घातली म्हणून पोलिसांकडून मारहाण

By admin | Published: February 16, 2017 08:02 PM2017-02-16T20:02:09+5:302017-02-16T20:31:37+5:30

14 वर्षीय मुलीला फाटलेली जीन्स घातली म्हणून पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना येथील शिराजमध्ये घडली आहे.

Strike the police as a tattooed jeans | फाटकी जीन्स घातली म्हणून पोलिसांकडून मारहाण

फाटकी जीन्स घातली म्हणून पोलिसांकडून मारहाण

Next
>ऑनलाइन लोकमत
इराण, दि. 16 -  फाटलेली जीन्स घातली म्हणून 14 वर्षीय मुलीला पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना येथील शिराझमध्ये घडली.
इराणच्या शिराझमध्ये गेल्या आठवड्यात 14 वर्षीय झोहरा (बदललेले नाव आहे) आपल्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा करत होती. त्यावेळी गस्त घालणा-या पोलिसांनी झोहरा आणि तिच्या मित्रांना जबरदस्तीने पोलीस व्हॅनमध्ये घातले. त्यानंतर त्यांना पोलिस स्टेशनमध्ये नेऊन मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येते. 
आम्हाला पोलिसांनी जबरदस्तीने पोलिस व्हॅनमध्ये घातले आणि मारहाण केली. तसेच, पोलिसांकडे कोणतेही कारण नसताना केवळ आम्ही फक्त फाटलेली जीन्स घातलेली होती म्हणून त्यांनी आम्हाला मारहाण करत पोलीस स्टेशनमध्ये नेले, असे झोहराने सांगितले. त्यानंतर इराणमध्ये महिलांसाठी असणा-या ड्रेस कोडचे पालक करण्यात येईल आणि आमच्याकडून यापुढे टाऊजर घालण्यात येणार नाही, असे लिहून घेतल्यानंतर आमची पोलिसांनी सुटका केली, असे यावेळी झोहराने सांगितले. 
दरम्यान, अशा घटना इराणमध्ये अनेक ठिकाणी घडल्या आहेत. इराण सरकारकडून महिलांच्या ड्रेस कोडबाबत अनेक जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ड्रेस कोडबाबत अनेक स्तरातून विरोध होताना दिसून येतो. 
 

Web Title: Strike the police as a tattooed jeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.