इंडोनेशियाला शक्तिशाली भूकंपाचा हादरा

By admin | Published: March 3, 2016 04:58 AM2016-03-03T04:58:23+5:302016-03-03T04:58:23+5:30

इंडोनेशियातील सुमात्रा बेटाच्या पश्चिम किनारपट्टीला बुधवारी शक्तिशाली भूकंपाचा हादरा जाणवला. रिश्टर मापकावर या भूकंपाची नोंद ७.९ एवढी झाली. या भूकंपानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी त्सुनामीचा इशारा दिला.

A strong earthquake strikes Indonesia | इंडोनेशियाला शक्तिशाली भूकंपाचा हादरा

इंडोनेशियाला शक्तिशाली भूकंपाचा हादरा

Next

जकार्ता : इंडोनेशियातील सुमात्रा बेटाच्या पश्चिम किनारपट्टीला बुधवारी शक्तिशाली भूकंपाचा हादरा जाणवला. रिश्टर मापकावर या भूकंपाची नोंद ७.९ एवढी झाली. या भूकंपानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी त्सुनामीचा इशारा दिला.
भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६.२० वाजता हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू पडांग या शहराच्या आग्नेयेला ८०८ कि.मी. दूर समुद्रात १० कि.मी. खोलवर होता. भूकंप होताच पश्चिम सुमात्रा, उत्तर सुमात्रा आणि अ‍ॅचे येथे त्सुनामीचा इशारा देण्यात आला; मात्र कोठूनही हानी झाल्याचे तत्काळ वृत्त आले नाही.
इंडोनेशिया हा भूकंपप्रवण देश आहे. या बेटाला भूकंपाचे वारंवार हादरे बसतात. या भागात जागृत ज्वालामुखीही आहेत. मोठ्या भूगर्भीय हालचालींमुळे येथे भूकंप होत असतात.

Web Title: A strong earthquake strikes Indonesia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.