तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; इमारती कोसळल्या, चार ठार
By हेमंत बावकर | Published: October 30, 2020 08:47 PM2020-10-30T20:47:13+5:302020-10-30T20:47:41+5:30
Earthquake: प्राथमिक माहितीनुसार तुर्कस्तानमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
तुर्कस्तान आणि ग्रीसच्या सीमेवर शुक्रवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. यामुळे ग्रीसवर त्सुनामीचे संकट असून तुर्कस्तानमध्येही मोठी पडझड झाली आहे. इजमिरमध्ये अनेक इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. 7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार तुर्कस्तानमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तुर्कस्तानचे आरोग्य मंत्री फहार्टिन कोका यांनी सांगितले की, आपल्या चार नागरिकांनी भूकंपामध्ये प्राण गमावले आहेत. तुर्कस्तानच्या किनाऱ्य़ावरील शहर इजमिरमध्ये इमारती कोसळल्या आहेत. इजमिरच्या गव्हर्नरांनी सांगितले की, 70 लोकांना वाचविण्यात आले आहे.
Building collapses after massive earthquake hits western #Turkey#izmirpic.twitter.com/KztimGTvln
— Press TV (@PressTV) October 30, 2020
तुर्कस्तानचे मंत्री सुलेमान सोयलू यांनी ट्विटरवर सांगितले की, आतापर्यंत आम्हाला सहा इमारती कोसळल्याची माहिती मिळाली आहे. भूकंपामुळे बोर्नोवा आणि बेराकली शहरात इमारतींचे नुकसान झाले आहे. यानंतर लगेचच मदत सुरु झाली असून इमारतीमध्ये अडकलेल्या आणि जखमींना उपचारासाठी अनेक पथके कार्यरत झाली आहेत.
Another tsunami footage from the earthquake in Izmir province of Turkey.
— Ragıp Soylu (@ragipsoylu) October 30, 2020
This one is really dangerous pic.twitter.com/62zfddWSi8
ग्रीक मीडियानुसार समोसच्या पूर्वेकडील ईजियन बेटावर छोट्या त्सुनामीच्या लाटा उसळल्या होत्या. इमारतींनाही नुकसान झाले आहे. अमेरिकी जिओलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपाचे केंद्र ग्रीसच्या नोन कार्लोवसियन शहराच्या उत्तर-पूर्वेकडे 14 किमी अंतरावर होते.