प्रचंड हिमवृष्टीचा हृदयविकाराशी संबंध?

By admin | Published: February 17, 2017 12:48 AM2017-02-17T00:48:17+5:302017-02-17T00:48:17+5:30

प्रचंड हिमवृष्टी होणाऱ्या भागात राहणाऱ्या लोकांना हिमवादळानंतर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे

Strong ice age heart attack? | प्रचंड हिमवृष्टीचा हृदयविकाराशी संबंध?

प्रचंड हिमवृष्टीचा हृदयविकाराशी संबंध?

Next

वॉशिंग्टन : प्रचंड हिमवृष्टी होणाऱ्या भागात राहणाऱ्या लोकांना हिमवादळानंतर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होणाऱ्या भागातील लोकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे संशोधकांनी म्हटले आहे. रस्त्यावरील किंवा घरासमोरील बर्फ हटविताना अनेकदा हृदयविकाराचा झटका येतो. हिवाळ्यात हृदयविकाराचे प्रमाण वाढते. या काळातील हृदयविकाराचा झटका घातक ठरू शकतो. मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाल्यानंतर बर्फ हटविण्यासाठी महिलांपेक्षा पुरुष अधिक पुढाकार घेतात. त्यामुळे त्यांना हा धोका अधिक असतो. फावड्यातील बर्फाचे ओझे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी कमाल हृदयगतीच्या ७५ टक्के गतीची गरज भासते. यात अनेकदा ताण पडून हृदयविकाराचा झटका येतो, असे क्युबेक, कॅनडा येथील मॉन्ट्रेल विद्यापीठाचे नथाली आॅगर यांनी सांगितले.
क्युबेकमध्ये १९८१ ते २०१४ यादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे १,२८,०७३ लोक रुग्णालयात दाखल झाले होते आणि त्यातील ६८ हजार १५५ लोकांचा मृत्यू झाला होता. संशोधकांनी या माहितीचे विश्लेषण करून हिमवृष्टीचा हृदयविकाराशी संबंध असल्याचा निष्कर्ष काढला. कॅनडात नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान हिमवृष्टी होते. संशोधकांनी त्यांचे विश्लेषण या काळापुरतेच मर्यादित ठेवले आणि हवामान खात्यातून हवामानाची संपूर्ण माहिती मिळवली. अशा परिस्थितीत महिलांच्या तुलनेत पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो. हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या किंवा दगावलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक पुरुष होते, असेही आॅगर यांनी सांगितले.

Web Title: Strong ice age heart attack?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.