पाक संसदेत जोरदार शाब्दिक चकमकी
By admin | Published: September 4, 2014 01:23 AM2014-09-04T01:23:27+5:302014-09-04T01:23:27+5:30
पाकिस्तान संसदेत बुधवारी सत्ताधारी पक्ष आणि इम्रान खान यांच्या पक्षाचे सदस्य यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली.
Next
इस्लामाबाद : पाकिस्तान संसदेत बुधवारी सत्ताधारी पक्ष आणि इम्रान खान यांच्या पक्षाचे सदस्य यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. सरकार व इम्रान खान यांच्या पक्षाने परस्परांवर लोकशाहीला सुरुंग लावल्याचा आरोप केला. खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तहरिक ए इन्साफ व मौलवी ताहिरूल कादरी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान अवामी तहरिकचे पाठीराखे सदस्य एकीकडे व दुसरीकडे सरकारला पाठिंबा देणारे अशी उघड दुफळी संसदेत निर्माण झाली होती.
पंतप्रधान नवाज शरीफ सरकारशी चर्चा करण्यास खान व कादरी यांनी तयारी दाखविली. शरीफ यांना पाठिंबा देण्यासाठी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावण्यात आले होते. खान यांच्या पक्षाच्या संसद सदस्यांनी पदाचे राजीनामे दिले होते. ते मंजूर झालेले नाहीत. राजीनामा देणारे हे सदस्यही या अधिवेशनाला उपस्थित होते.
पीटीआयचे नेते शाह महेमूद कुरेशी यांनी संसदेत आपली बाजू मांडताना सरकारच्या पाठीराख्यांवर आरोपांचा भडिमार केला. संसद वाचावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आमच्या पक्षाने कधीही लोकशाहीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला नाही की करणारही नाही. सुरुवातीला शरीफ सभागृहात उपस्थित होते; परंतु कुरेशी यांचे भाषण सुरू होताच ते निघून गेले. (वृत्तसंस्था)
4इस्लामाबाद : देशातील राजकीय पेचप्रसंग मिटविण्यासाठी विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने इम्रान खान व मौलवी ताहिरूल कादरी यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. हा पेचप्रसंग दूर करण्यासाठी जो काही निर्णय होईल त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन जमात ए इस्लामीचे प्रमुख सिराज ऊल हक यांच्या नेतृत्वाखालील संसद सदस्यांनी इम्रान खान व कादरी यांना दिले.