धक्कादायक! रात्रभर जागून खेळत होता गेम, झोप कमी झाल्याने गमवावा लागला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 01:53 PM2021-08-27T13:53:56+5:302021-08-27T13:58:31+5:30
या तरूणाच्या आईने याबाबत बोलताना सांगितलं की, माझ्या मुलाला रात्र-रात्रभर जागण्याची सवय होती आणि तो सकाळपर्यंत गेम्स खेळत राहत होता.
आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या आणि ऑनलाईन गेम्सच्या विश्वात लहान मुलांसाठी अनेक समस्या समोर येत आहेत. कारण लहान मुलांना गेम्सची सवय लागते आणि खासकरून टीनएजच्या मुलांचा मेंदू अॅडिक्ट होण्यासाठी गेम्स तसे तयार केले जातात. हे गेम्स किती घातक ठरू शकतात याचं एक उदाहरण थायलॅंडमधून समोर आलं आहे. इथे झोप पूर्ण न झाल्याने एका १८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
या तरूणाच्या आईने याबाबत बोलताना सांगितलं की, माझ्या मुलाला रात्र-रात्रभर जागण्याची सवय होती आणि तो सकाळपर्यंत गेम्स खेळत राहत होता. जर त्याला कॉम्प्युटर मिळाला नाही तर तो मोबाइलवर गेम खेळत होता. पण मी त्याकडे चिंतेने कधी बघितलं नाही. मी निश्चिंत होते की, त्याला काही होणार नाही.
त्या पुढे म्हणाल्या की, त्या त्यांच्या मुलाच्या बाजूच्या रूममध्ये झोपत होत्या. मला अर्द्यारात्री त्याच्या बाथरूममध्ये आवाज येत होता. कारण तो रात्री आंघोळ करत होता. त्यानंतर तो रात्रभर गेम खेळत राहत होता. पण एका रात्री मी टेंशनमध्ये आले. कारण तो फोन उचलत नव्हता.
त्या म्हणाल्या की, तो फोनही उचलत नव्हता आणि आपल्या रूमचा दरवाजाही उघडत नव्हता. त्यानंतर मी शेजाऱ्यांची मदत घेतली. त्यानंतर आम्ही त्याचा दरवाजा उघडला. मला दिसलं की, माझा मुलगा बेशुद्ध पडला आहे. त्याचा मोबाइल बाजूलाच पडला होता. मी कधीही विचार नव्हता केला की, गेम खेळल्याने माझ्या मुलाची ही स्थिती होईल.
याप्रकरणी बोलताना पोलिसांनी सांगितलं की, अशी शक्यता आहे की, तरूणाचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला असावा. कारण स्पष्ट आहे की, तो फार कमी झोप घेत होता. तसेच त्याला सकाळी उठून शाळेतही जायचं होतं. त्याच्या शरीराला पुरेसा आराम मिळत नव्हता. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, दोन वर्षाआधीही थायलॅंडमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला होता. कारण तो रात्रभर आपल्या कॉम्प्युटरवर गेम खेळत होता. या मुलालाही गेमची सवय लागली होती. शाळेत जेवणाच्या सुट्टीतही तो गेम खेळत होता. त्याला आई-वडिलांनी खूप समजावलं होतं, पण त्याने काही ऐकलं नाही.