विद्यार्थी व प्राध्यापकांना "या" राज्यात कॉलेजमध्ये घेऊन जाता येणार बंदूक

By Admin | Published: July 2, 2017 04:14 PM2017-07-02T16:14:15+5:302017-07-02T16:14:15+5:30

अमेरिकेतल्या केन्सास राज्यातील सरकारनं एका नव्या नियमाला मान्यता दिली आहे.

Students and professors "take this gun to the college" in the state | विद्यार्थी व प्राध्यापकांना "या" राज्यात कॉलेजमध्ये घेऊन जाता येणार बंदूक

विद्यार्थी व प्राध्यापकांना "या" राज्यात कॉलेजमध्ये घेऊन जाता येणार बंदूक

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 2 - अमेरिकेतल्या केन्सास राज्यातील प्रशासनानं एका नव्या नियमाला मान्यता दिली आहे. केन्सास कॉलेजमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव विद्यार्थी आणि प्राध्यापकांना बंदूक घेऊन जाण्याची सूट देण्यात आली आहे. स्वतःवर होणा-या संभाव्य हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी ही परवानगी देण्यात आली आहे.

गेल्या चार वर्षांपूर्वी सार्वजनिक इमारतीमध्ये लपून बंदूक बाळगण्याच्या कायद्याला मंजुरी देण्यात आली होती. केन्सास प्रशासनानं या नियमाला मंजुरी दिल्यानं आता कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना बंदूक बाळगता येणार आहे. कॉलेजमधल्या सुरक्षेच्या कारणास्तव या नव्या नियमाला राज्य संसदेनं मान्यता दिली आहे. तसेच काही इतर प्रकरणात बंदूक ठेवण्यासाठी कडक निर्बंधही लादण्यात आले आहेत. या नव्या नियमामुळे जॉर्जिया आणि इतर राज्यांच्या यादीत केन्सासनंही स्थान मिळवलं आहे. या नियमानुसार विद्यार्थी आणि कॅम्पस फॅकल्टीला कॉलेज परिसरात बंदूक ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि दक्षिण कॅलिफोर्नियासह 16 राज्यांमध्ये अद्यापही कॉलेजमध्ये बंदूक घेऊन जाण्यात बंदी आहे. या निर्णयानंतर कॉलेजच्या प्राध्यापकांनी चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणात प्राध्यापक फिलीप नेल म्हणाले, मी दुस-या नोकरीच्या शोधात असून, बंदूक घेऊन येणा-या विद्यार्थ्यांनी मी शिकवणार नाही. त्यामुळे माझ्या जिवाला धोका पोहोचू शकतो.

गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेत अनेक गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. अमेरिकेतल्या यूपीएस व्हेअरहाऊस आणि ग्राहक सेवा केंद्रामध्ये एका व्यक्तीकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गोळीबार करणा-या व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. लोकल मीडिया रिपोर्टनुसार या गोळीबारात अनेक जखमी झाल्याचे सांगण्यात येते होते. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेमुळे पोलिसांनी आजूबाजूचा परिसर बंद केला होता. सन फ्रान्सिस्कोमधल्या पोर्टेरो हिल 2.5 मैलांवर ही गोळीबाराची घटना घडली होती. पोलिसांनी गोळीबार झालेल्या परिसरात जाण्यास मनाई केली होती.

(कॅलिफोर्नियात भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार, प्रकृती नाजूक)

तत्पूर्वी अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये एका ज्येष्ठ खासदारावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर गोळीबार करणा-या संशयिताचा मृत्यू झाला होता, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली होती. रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते स्टीव्ह स्कॅलिस यांच्यावर बंदुकधारी हल्लेखोराने गोळीबार केला होता. या गोळीबारात स्टिव्ह स्कॅलिस यांच्यासह 5 जण गंभीर जखमी झाले होते. या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यासह किमान 5 जण गंभीर जखमी झाले होते. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, वॉशिंग्टनजवळील उपनगरात अमेरिकी काँग्रेसमधील सदस्यांमध्ये बेसबॉलचा सामना होणार आहे. दरवर्षी अशा स्वरुपाचा सामन्याचे आयोजन केले जाते आणि या सामन्यासाठी बुधवारी सकाळी व्हर्जिनियामध्ये सराव सुरू होता. सरावासाठी रिपब्लिकन पक्षाचे खासदार स्टिव्ह स्कॅलिस आणि अन्य मंडळी उपस्थित होती. अचानक एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबाराला सुरूवात केली. ह्यस्कॅलिस यांना नीट चालताही येत नव्हतं. घटनास्थळावरुन बाहेर पडतानाही त्यांना त्रास होत होताह्ण असं अमेरिकी काँग्रेसमधील मॉ ब्रुक्स यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं.

Web Title: Students and professors "take this gun to the college" in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.