विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल झाले होते महिला शिक्षिकेचे प्रायव्हेट फोटो आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 11:18 AM2022-12-08T11:18:37+5:302022-12-08T11:18:55+5:30

Teacher Private Photo Viral : फिजिक्स टीचर क्रिस्टी बुचान उर्फ जेसिका जॅकरेबिट स्कॉटलॅंडच्या (Scotland) एका शाळेत शिकवत होती. ती अभिनेत्रीही होती. तिने सांगितलं की, विद्यार्थ्यांमध्ये तिचे फोटो व्हायरल होत होते.

Students saw school teacher private photos ruckus created | विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल झाले होते महिला शिक्षिकेचे प्रायव्हेट फोटो आणि मग...

विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल झाले होते महिला शिक्षिकेचे प्रायव्हेट फोटो आणि मग...

Next

Teacher Private Photo Viral : फिजिक्स टीचरचे प्रायव्हेट फोटो विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल झाले. यानंतर टीचर विरोधात पालकांना आवाज उठवला. त्यामुळे महिला टीचरला शाळेतून राजीनामा द्यावा लागला. या महिला टीचरने एका सबक्रिप्शन बेस्ड वेबसाईटवर अकाउंट सुरू केलं होतं आणि त्यावर ती कंटेंट पोस्ट करत होती. महिला टीचरने सांगितलं की, ती आजारी मुलाच्या उपचाराच्या खर्चासाठी हे काम करत होती. 

फिजिक्स टीचर क्रिस्टी बुचान उर्फ जेसिका जॅकरेबिट स्कॉटलॅंडच्या (Scotland) एका शाळेत शिकवत होती. ती अभिनेत्रीही होती. तिने सांगितलं की, विद्यार्थ्यांमध्ये तिचे फोटो व्हायरल होत होते. त्यामुळे तिच्याकडे शाळा सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. फोटोज व्हायरल झाल्याचं तिला समजलं तेव्हा ती तणावात होती. क्रिस्टीने चौकशी आधीच राजीनामा दिला.

क्रिस्टी म्हणाली की, तिच्या 11 वर्षीय मुलाला पोटाचा गंभीर आजार आहे. त्याचं ऑपरेशन होणार होतं. उपचारासाठी काही जास्त पैसे मिळाले, यासाठी तिने तिचे प्रायव्हेट फोटो वेबसाईटवर टाकले. क्रिस्टी म्हणाली की, शाळेने तिला तिचा पगार देण्यास नकार दिला. अशात ती तिच्या आजारी मुलावर उपचार कसे करणार, हा विषय तिच्यासाठी चिंतेचा झाला आहे.

क्रिस्टीने सांगितलं की, ती पुरूष प्रधान समाजात फिजिक्स टीचर आहे. हेही अनेकांना बघवत नव्हतं. तसेच ती हेही म्हणाली की, महिला सुद्धा तिच्या यशाकडे पाहून चिडत होत्या.

फोटो व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी राग व्यक्त केला होता. एका मुलाच्या पालकांनी सांगितलं की, क्रिस्टी बुचानचे फोटो व्हायरल झाले होते आणि याची चर्चा व्हॉट्सअॅपवर होत होती. त्यानंतर पालकांनी शाळेकडे तक्रार केली. शाळेने सांगितलं की, फोटो व्हायरल झालेल्या महिलेने राजीनामा दिला आहे.

Web Title: Students saw school teacher private photos ruckus created

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.