चीनमध्ये कैद्यांच्या शरीरातून केली जात आहे किडनीची चोरी, मृत्यूआधीच काढलं जात आहे हृदय!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 02:26 PM2022-04-06T14:26:36+5:302022-04-06T14:28:20+5:30

Organs Harvesting In China : चीनमध्ये कैद्यांना मृत्यूआधीच मारलं जातं. या कैद्यांना जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली आहे. पण मृत्यूआधीच त्यांच्या शरीरातून किडनी आणि हृदय  (Organs Harvesting In China)काढलं जात आहे.

Study: Chinese Doctors Executed Prisoners by Organ Removal | चीनमध्ये कैद्यांच्या शरीरातून केली जात आहे किडनीची चोरी, मृत्यूआधीच काढलं जात आहे हृदय!

चीनमध्ये कैद्यांच्या शरीरातून केली जात आहे किडनीची चोरी, मृत्यूआधीच काढलं जात आहे हृदय!

googlenewsNext

चीनमधून (China) नेहमीच काहीना काही विचित्र किंवा धक्कादायक घटना समोर येत असतात. कोरोना पसरवण्याचा आरोप चीनवर लागला होता. यानंतर तेथील लोकांच्या स्वातंत्र्यावर सरकारचा कंट्रोल आहे. आता तर अशी बातमी समोर आली आहे की, येथील लोकांचा जीवही सरकारच्या हाती आहे. एका रिपोर्टनुसार, चीनमध्ये कैद्यांना मृत्यूआधीच मारलं जातं. या कैद्यांना जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली आहे. पण मृत्यूआधीच त्यांच्या शरीरातून किडनी आणि हृदय  (Organs Harvesting In China)काढलं जात आहे.

चीनमध्ये १९८४ पासूनच मृत्यूची शिक्षा मिळालेल्या कैद्यांच्या शरीरातून अवयव काढणं कायदेशीर आहे. पण ह्यूमन राइट्स ग्रुपने सांगितलं की, चीनमध्ये काही कैद्यांच्या शरीरातून अवयव मृत्यूआधीच काढले जातात. चीनमध्ये अवयव ट्रान्सप्लांटसाठी सर्वात कमी वेटिंग पिरियअ असतो, तर तिथे डोनर्सही फार कमी आहेत. त्यामुळे या दाव्याला बळ मिळत आहे.

ऑस्ट्रेलियन नॅशनल यूनिव्हर्सिटीचे मॅथ्यू रॉबर्ट्सन यांना रिसर्चमधून आढळलं की, चीनच्या काही तुरूंगांमध्ये कैद कैद्यांची सर्जरी ते जिवंत असतानाच केली गेली. हा रिपोर्ट अमेरिकन जर्नल ऑफ ट्रान्सप्लांटेशनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यातून समोर आलं की, कैद्यांना ब्रेन डेड सांगून त्यांच्या शरीरातून किडनी आणि हृदय काढलं जातं. यातील काहींना तर विना ब्रेन डेड डिक्लेअर करताच सर्जरीतून जाव लागतं.

चीनमध्ये १९८४ पासून असा कायदा पास केला गेला की, ज्या कैद्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असेल आणि त्यांचा मृतदेह घ्यायला कुणी येत नसेल तर त्यांच्या शरीरातून किडन आणि लिव्हर काढलं जाऊ शकतं. पण २०१९ मध्ये इंटरनॅशनल ट्रिब्यूनलमध्ये आढळून आलं की, कैद्यांना मृत्यूआधीच मारलं जात आहे. विना फाशी देताच त्यांच्या शरीरातून किडनी आणि हृदय काढलं जात आहे.
 

 

Web Title: Study: Chinese Doctors Executed Prisoners by Organ Removal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.