दुसरी लाट टाळण्यासाठी जर्मनीत सांडपाण्यावर अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:24 AM2020-06-06T05:24:01+5:302020-06-06T05:24:12+5:30
लिपझिग : जगभर ‘कोविड-१९’ या रोगाने हाहाकार माजविला असतानाच अनेक देशांतील शास्त्रज्ञ यावर लस शोधण्यासाठी झटत आहेत. दुसरीकडे, या ...
लिपझिग : जगभर ‘कोविड-१९’ या रोगाने हाहाकार माजविला असतानाच अनेक देशांतील शास्त्रज्ञ यावर लस शोधण्यासाठी झटत आहेत. दुसरीकडे, या रोगाची दुसरी लाट टाळण्यासाठी जर्मन शास्त्रज्ञ सांडपाण्यावर अभ्यास करीत आहेत.
यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी जर्मनीत एक प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणाऱ्या केंद्रावर प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी शास्त्रज्ञ त्यावर अभ्यास करीत आहेत. जर्मनीने सध्या या महामारीवर बºयापैकी नियंत्रण मिळविले आहे. मानवी विष्ठेत कोरोना विषाणूचे अवशेष असतात. सांडपाण्यातील विषाणूंचे प्रमाण नेहमीपेक्षा वाढलेले असल्यास ते नव्याने लाट येत असल्याचे संकेत असतील. त्याआधारे तातडीने हालचाल करून ही लाट रोखण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न सुरू करता येऊ शकेल, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
हेमहोत्झ सेंटर फॉर इन्हायर्नमेंटल रिसर्च या आघाडीच्या संशोधन केंद्रातही या प्रकल्पावर अभ्यास सुरू आहे.
हा अभ्यास वाटतो तितका सोपा नसल्याचे मत या प्रकल्पातील विषाणूतज्ज्ञ रेने कॅ लिस यांनी मांडले. ‘‘लिपझिगमधील मुख्य सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील प्रवाह २४ तास वाहत असतो. दर २ मिनिटांनी सांडपाण्याचे नमुने घेतले जातील. मोठ्या नदीप्रमाणे असलेल्या सांडपाण्याच्या प्रवाहातून अशा प्रकारे नमुने घेऊन त्यातील आरएनएची तपासणी करणे, हे काम आव्हानात्मक असेल. पण अभ्यासक म्हणून या प्रकल्पाचा कालावधी आमच्यासाठी संस्मरणीय असेल, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)