‘नासा’च्या मिशनमध्ये भारतीय वंशाच्या सुबाशिनी अय्यर, चंद्रावर मनुष्य उतरवण्याच्या प्रोजेक्टमध्ये महत्त्वाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 08:34 AM2021-06-07T08:34:16+5:302021-06-07T08:34:45+5:30

Subashini Iyer : भारतीय वंशाच्या इंजिनीअर सुबाशिनी अय्यर या नासाच्या आर्टिमिस मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. या मिशनमध्ये चंद्रावर नासा पुन्हा एकदा मनुष्याला उतरविण्याचा प्रयत्न करणार आहे.

Subashini Iyer, of Indian descent, plays a key role in NASA's mission to land man on the moon | ‘नासा’च्या मिशनमध्ये भारतीय वंशाच्या सुबाशिनी अय्यर, चंद्रावर मनुष्य उतरवण्याच्या प्रोजेक्टमध्ये महत्त्वाची जबाबदारी

‘नासा’च्या मिशनमध्ये भारतीय वंशाच्या सुबाशिनी अय्यर, चंद्रावर मनुष्य उतरवण्याच्या प्रोजेक्टमध्ये महत्त्वाची जबाबदारी

googlenewsNext

मेलबर्न / वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे अनेक वैज्ञानिक अमेरिकन स्पेस एजन्सी ‘नासा’मध्ये मोठी कामगिरी करताना दिसत आहेत. या यादीत आता भारताची कन्या सुबाशिनी अय्यर यांचे नाव जोडले गेले आहे. नासाच्या महत्त्वपूर्ण अशा आर्टिमिस मिशनमध्ये त्या मदत करणार आहेत. 
भारतीय वंशाच्या इंजिनीअर सुबाशिनी अय्यर या नासाच्या आर्टिमिस मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. या मिशनमध्ये चंद्रावर नासा पुन्हा एकदा मनुष्याला उतरविण्याचा प्रयत्न करणार आहे. या मिशनमध्ये सुबाशिनी अय्यर रॉकेटच्या कोर स्टेजचे काम सांभाळत आहेत. आर्टिमिस मिशन 
ही नासाची महत्त्वाकांक्षी योजना 
आहे. याच्या पहिल्या टप्प्याची 
देखरेख इंजिनीअर सुबाशिनी अय्यर करत आहेत.
नासाच्या मिशन आर्टिमिस १ मध्ये चंद्रावर स्पेसक्राफ्ट ओरियन जाणार आहे. ते पृथ्वीपासून जवळपास ४ लाख ५० हजार किमीचे अंतर पार करणार आहे. ही मोहीम तीन आठवड्यांची आहे. २०२४ मध्ये आर्टिमिस - २ मिशनअंतर्गत मनुष्याला चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. सुबाशिनी अय्यर नासाच्या आर्टिमिस -१ मिशनच्या लाँच इंटिग्रेटेड प्रोडक्ट टीमचे नेतृत्व करत आहेत. ‌(वृत्तसंस्था)

कोण आहेत सुबाशिनी?

-  सुबाशिनी अय्यर तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथे जन्मलेल्या आहेत. 
- १९९२ मध्ये त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली. गत दोन वर्षांपासून त्या नासाच्या मून मिशनमध्ये स्पेस लाँच सिस्टीम म्हणजे, एसएलसी प्रोजेक्टवर काम करत आहेत.

Web Title: Subashini Iyer, of Indian descent, plays a key role in NASA's mission to land man on the moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.