नासाच्या 'जुनो' अवकाश यानाचा गुरुच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2016 12:14 PM2016-07-05T12:14:20+5:302016-07-05T12:35:09+5:30

नासाच्या मानवरहीत 'जुनो' अवकाश यानाने सोमवारी यशस्वीरित्या गुरु ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला.

Successful entry into NASA's 'Juno' space system | नासाच्या 'जुनो' अवकाश यानाचा गुरुच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

नासाच्या 'जुनो' अवकाश यानाचा गुरुच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

Next

ऑनलाइन लोकमत 

पासाडेना, दि. ५ -  नासाच्या मानवरहीत 'जुनो' अवकाश यानाने सोमवारी यशस्वीरित्या गुरु ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला. या यानाने गुरु ग्रहाभोवती भ्रमण सुरु करुन आपले काम सुरु केले आहे. गुरु ग्रह आणि सुर्य मालेतील रहस्य जाणून घेण्यासाठी नासाने ही मोहिम आखली आहे. 
 
एकूण १.१ अब्ज डॉलर खर्चाची ही मोहिम आहे. पाचवर्षांपूर्वी पाच ऑगस्ट २०११ रोजी फ्लोरिडाच्या केप कानार्वेल तळावरुन जुनो अवकाश यानाने गुरु ग्रहाच्या दिशेने उड्डाण केले होते. जुनोने एकूण २.७ अब्ज किलोमीटरचा प्रवास केला. जुनोने कक्षेत प्रवेश केल्याचा सिग्नल मिळताच नासाच्या नियंत्रण कक्षात उपस्थित शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला. 
 
गुरुच्या कक्षेत प्रवेश करताना जुनो यानातील इंजिन प्रज्वलित झाले आणि वेग कमी झाला. गुरु आणि पृथ्वीमधील अंतरामुळे काही मिनिटांच्या अंतराने नियंत्रण कक्षाला सिग्नल मिळत होते. कक्षेत प्रवेश करताना यानाची स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित होती. 
 
प्रवेशाच्यावेळी कॅमेरा आणि अन्य उपकरणे बंद करण्यात आली होती. जुनोमुळे गुरु ग्रहाची अत्यंत जवळून छायाचित्रे शास्त्रज्ञांना उपलब्ध होणार आहेत. गुरु ग्रहावर हायड्रोजन, हेलियम हे वायू आहेत. 
 

Web Title: Successful entry into NASA's 'Juno' space system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.