चीनच्या अंतराळ यानाचे यशस्वी प्रक्षेपण

By Admin | Published: October 18, 2016 05:01 AM2016-10-18T05:01:45+5:302016-10-18T05:01:45+5:30

चीनच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी अंतराळ यानाचे दोन अंतराळवीरांसह यशस्वी प्रक्षेपण झाले

The successful launch of China's spacecraft | चीनच्या अंतराळ यानाचे यशस्वी प्रक्षेपण

चीनच्या अंतराळ यानाचे यशस्वी प्रक्षेपण

googlenewsNext


बीजिंग : चीनच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी अंतराळ यानाचे दोन अंतराळवीरांसह यशस्वी प्रक्षेपण झाले. २०२२ पर्यंत आपले स्थायी अंतराळ स्टेशन स्थापन करण्याचे चीनचे लक्ष्य आहे. त्या दिशेने चीन पाऊले टाकत आहे.
‘शेनझोउ-११’ यानातून जिंग हाइपेंग (५०) आणि चेन दोंग (३७) यांनी स्थानिक वेळेनुसार साडेसात वाजता उड्डाण केले. या प्रक्षेपणानंतर ‘लाँग मार्च-२ एफ’वाहक रॉकेट शेनझोउ ११ ला कक्षेत घेऊन गेले. हे यान दोन दिवसांत पृथ्वीची परिक्रमा करणाऱ्या तियानगोंग-२ अंतराळ प्रयोगशाळेत पोहोचेल. त्यानंतर दोन्ही अंतराळवीर ३० दिवस तिथे राहतील. आमचा अंतराळ कार्यक्रम शांततेचा असून, बिनलष्करी कार्यक्रमाशिवाय त्यांनी उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राचेही परीक्षण केलेले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The successful launch of China's spacecraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.