सुदानमध्ये लष्कराचे विमान कोसळले; आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:32 IST2025-02-26T15:31:50+5:302025-02-26T15:32:27+5:30

Sudanese Military Aircraft Crashed: सुदान 2023 पासून गृहयुद्धाच्या गर्तेत आहे.

Sudanese Military Aircraft Crashed 46 death and many injured till now | सुदानमध्ये लष्कराचे विमान कोसळले; आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

सुदानमध्ये लष्कराचे विमान कोसळले; आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

Sudanese Military Aircraft Crashed: गृहयुद्धाच्या आगीत होरपळणाऱ्या सुदान देशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील ओमदुरमन शहरात लष्कराचे विमान कोसळले, ज्यात 46 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी आहेत. लष्कर आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी बुधवारी (26 फेब्रुवारी) या घटनेची माहिती दिली. या अपघातात अनेक लष्करी जवान आणि नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

सुदानच्या लष्कराच्या अहवालानुसार, लष्कराचे अँटोनोव्ह विमान मंगळवारी (24 फेब्रुवारी) वाडी सय्यदना एअरबेसवरून उड्डाण घेत असताना क्रॅश झाले. या अपघातामागील मुख्य कारणाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. 

2 वर्षांपासून गृहयुद्धाची परिस्थिती
सुदान 2023 पासून गृहयुद्धाच्या गर्तेत आहे. येथे लष्कर आणि कुख्यात निमलष्करी गट रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) यांच्यातील तणावामुळे युद्ध पेटले आहे. हा संघर्ष शहरी भागात, विशेषत: दारफुर प्रदेशात विनाशकारी बनला असून, वांशिक हिंसाचार आणि सामूहिक बलात्कार यांसारख्या भयानक घटना घडत आहेत. संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय अधिकार संघटनांनी या घटनांना मानवतेविरोधातील गंभी गुन्हे आणि युद्ध गुन्हे म्हणून संबोधले आहे.

परिस्थिती सतत बिघडत चालली आहे
अलिकडच्या काही महिन्यांत लष्कराने खार्तूम आणि इतर भागात आरएसएफविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. अशा घटनांमुळे सुदानचे संकट आणखी गुंतागुंतीचे होत आहे आणि त्यामुळे नागरी सुरक्षा आणि शांततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
 

Web Title: Sudanese Military Aircraft Crashed 46 death and many injured till now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.