अचानक अ‍ॅसिडमध्ये परिवर्तित झाले नदीचे पाणी, एक थेंब जरी अंगावर पडला तरी होतोय त्वचेचा दाह 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 03:03 PM2021-04-27T15:03:00+5:302021-04-27T15:05:07+5:30

River water turned into acid : वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हासही मोठ्या प्रमाणात होत आहे. मानवाच्या वाढत्या भौतिक गजरांची पूर्तता करताना पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी केली जात आहे.

Suddenly the river water turned into acid, even if a drop fell on the body, it caused inflammation of the skin |  अचानक अ‍ॅसिडमध्ये परिवर्तित झाले नदीचे पाणी, एक थेंब जरी अंगावर पडला तरी होतोय त्वचेचा दाह 

 अचानक अ‍ॅसिडमध्ये परिवर्तित झाले नदीचे पाणी, एक थेंब जरी अंगावर पडला तरी होतोय त्वचेचा दाह 

Next

ग्लासगो - औद्योगिकीकरणाने वेग घेतल्यापासून मानवाच्या गरजा वाढल्या आहेत. वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हासही मोठ्या प्रमाणात होत आहे. मानवाच्या वाढत्या भौतिक गजरांची पूर्तता करताना पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी केली जात आहे. पर्यावरणाच्या हानीचा असाच एक धक्कादायक प्रकार स्कॉटलंडमधून (Scotland) समोर आला आहे. एकीकडे जग कोरोनाशी झुंजत असताना येथील एका नदीचे पाणी अचानक अॅसिडमध्ये परिवर्तित झाल्याने खळबळ उडाली आहे. (river water turned into acid) आता अ‍ॅसिडमध्ये रूपांतरीत झालेल्या पाण्याचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. (Suddenly the river water turned into acid, even if a drop fell on the body, it caused inflammation of the skin) 

स्कॉटलंडमधील ग्लासगोमधून वाहणाऱ्या पोलमाडी बर्न नदीचे पाणी अचानक पिवळ्या रंगात रूपांतरीत झाले आहे. याचे फोटो अनेक ठिकाणी शेअर करण्यात आले आहेत. सुरुवातीला लोकांनी या नदीच्या पाण्याचा बदललेला रंग पाहिला तेव्हा त्यांनी हा चमत्कार आहे असे वाटले. मात्र प्रत्यक्षात हा माणसाने केलेल्या अक्षम्य चुकांचा परिणाम होता. नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या रासायनिक कारखान्यांनी कारखान्यातील प्रदूषित पाणी आणि इतर पदार्थ नदीत सोडले. त्यामुळे नदीचे पाणी पिवळ्या रंगात परिवर्तित झाले. 

नदीच्या पाण्याचा रंग पिवळा झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर स्कॉटलंडमदील एका संस्थेने पाण्याची तपासणी केली. या तपासणीमधून काही धक्कादायक माहिती समोर आली. या नदीचे पाणी अ‍ॅसिडमध्ये रूपांतरीत झाले होते. तसेच या नदीच्या पाण्यातील एक थेंब माणसाच्या त्वचेवर पडल्यास त्वचा जळू शकते असा धक्कादायर्क निर्ष्कर्ष संशोधकांनी मांडला. जर चुकून हे पाणी प्राशन केले तर गळा आणि मुत्रपिंड दोन्हींची हानी होऊ शकते. 

या नदीतील पाण्याचा वापर अनेक लोकांकडून केला जातो. या नदीच्या किनाऱ्यावर अनेक लोक वास्तव्यास आहेत. नदीकिनारी अनेक घरे आहेत. दरम्यान, या नदीतील पाणी पुन्हा शुद्ध करण्यासाठीच्या पर्यायाचा शोध शास्त्रज्ञांकडून घेतला जात आहे. दरम्यान, या पाण्यामुळे आतापर्यंत कुणाला हानी पोहोचल्याचे वृत्त आलेले नाही. मात्र या दूषित पाण्यामुळे नदीतील माशांचा मृत्यू झाला आहे.  

Web Title: Suddenly the river water turned into acid, even if a drop fell on the body, it caused inflammation of the skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.