सुएझचा जुळा भाऊ येणार
By admin | Published: August 7, 2014 02:11 AM2014-08-07T02:11:21+5:302014-08-07T02:11:21+5:30
जागतिक व्यापार आणि इतिहास यांना कलाटणी देणा:या सध्याच्या ऐतिहासिक सुएझ कालव्याला समांतर असा 72 किमी लांबीचा नवा कालवा खोदण्याचे इजिप्त सरकारने ठरविले
Next
>कैरो : जागतिक व्यापार आणि इतिहास यांना कलाटणी देणा:या सध्याच्या ऐतिहासिक सुएझ कालव्याला समांतर असा 72 किमी लांबीचा नवा कालवा खोदण्याचे इजिप्त सरकारने ठरविले असून यामुळे 1क्क् अब्ज डॉलरचा वाढीव व्यापार व महसूल निर्माण होण्याखेरीज 1क् लाख रोजगारही उपलब्ध होणार आहेत.
‘नवा कालवा खोदण्याचे काम एक वर्षात पूर्ण केले जाईल’, असे इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अस-सिसी यांनी सुएझ कॅनॉल कॉरिडॉर प्रॉजेक्टचे उद्घाटन करताना जाहीर केले. हा नवा कालवा सध्याच्या सुएझ कालव्याला समांतर असा खोदला जाईल, असे सुएझ कालवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मोहाब मामिश यांनी यावेळी सांगितल्याचे वृत्त ‘मिना’ या सरकारी वृत्तसंस्थेने दिले.
इजिप्तने तुम्हाला भरभरून दिले आहे तेव्हा श्रीमंत वर्गाने या कालव्यासाठी उभारल्या जात असलेल्या ‘ताह्या मस्र फंडा’स सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष जनरल सिसी यांनी केले.
सुएझला समांतर असा नवा कालवा खोदण्याचे स्वप्न इजिप्तच्या लागोपाठच्या तीन सरकारांनी उराशी बाळगले होते. सत्ताभ्रष्ट झालेले राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांच्या राजवटीत या कालव्याचा प्रस्ताव दोन वेळा पुढे आला होता पण त्यासाठी येणा:या प्रचंड खर्चामुळे ती योजना कागदावरच राहिली होती. नंतर ऑक्टोबर क्रांतीनंतर इस्लामी ब्रदरहूडचे मोहम्मद मोरसी सत्तेवर आल्यावर त्यांनीही हे स्वप्न रंगविले पण त्यांचा कार्यकाळ अनपेक्षितपणो संपुष्टात आल्याने ते पूर्ण होऊ शकले नव्हते. आता अल सिसी यांना कितपत यश मिळते याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
145 वर्षापूर्वी खोदलेल्या सुएझ कालव्यातून इजिप्तला वर्षाला पाच अब्ज अमेरिकी डॉलरचा महसूल मिळतो व अर्थव्यवस्थेचा तो मोठा तारणहार आहे. परंतु 2क्11 मधील उठावापासून इजिप्तचा पर्यटन उद्योग व परकीय गुंतवणुकीस ओहोटी लागली आहे. (वृत्तसंस्था)