इराकमध्ये आत्मघाती हल्ला, 35 जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2017 09:51 AM2017-05-21T09:51:59+5:302017-05-21T09:51:59+5:30
इराकची राजधानी बगदाद आणि इराकच्या दक्षिण भागांत दहशतवादी संघटना इसिसच्या दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
बगदाद, दि. 21 - इराकची राजधानी बगदाद आणि इराकच्या दक्षिण भागांत दहशतवादी संघटना इसिसच्या दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला. या हल्ल्यात 35 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
बगदादमध्ये पोलिसांच्या तपासणी नाक्यावर गाडीतून आलेल्या आत्मघातकी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात यामध्ये 24 जणांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले.
तर दुस-या घटनेत आत्मघाती हल्लेखोराने बसरा शहराजवळ स्फोटकांनी भरलेलं एक वाहन उडवण्यात आलं. येथील अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला या दरम्यान एखा हल्लेखोराला मारण्यातही सुरक्षा रक्षकांना यश आल्याचं वृत्त आहे.
इराकचे सैन्य मोसूलमध्ये आयसिसशी लढत असून जिहादींच्या ताब्यातून देशातील हे दुसरे मोठे शहर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी गेल्या जवळपास सात महिन्यांपासून मोठय़ा कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.