इस्तंबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू

By admin | Published: March 19, 2016 06:21 PM2016-03-19T18:21:13+5:302016-03-19T18:21:13+5:30

इस्तंबूलमध्ये गर्दी असलेल्या मार्केट परिसरात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात 20 जण जखमी झाले आहेत

Suicide attack in Istanbul kills 5 people | इस्तंबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू

इस्तंबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू

Next
>ऑनलाइन लोकमत - 
टर्की, दि. १९ - इस्तंबूलमध्ये गर्दी असलेल्या मार्केट परिसरात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात 20 जण जखमी झाले आहेत. आत्मघाती हल्ल्यात हा स्फोट झाल्याच्या माहितीला राज्यपालांनी दुजोरा दिला आहे. राज्यपालांच्या कार्यालयाजवळ हा स्फोट घडवण्यात आला.
 
स्फोट लवकर झाल्याने हल्लेखोराचं टार्गेट चुकल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. राज्यपालांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्यांपैकी एकजण आत्मघाती हल्लेखोर असून जखमींपैकी तिघांची परिस्थिती गंभीर आहे. इस्त्राईल दुतावासाने त्यांचे काही नागरिक या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी संपुर्ण परिसर सील केला असून तपास सुरु आहे.
 
टर्कीमध्ये गेल्या काही दिवसांत झालेले हल्ले - 
मार्च 2016 - अंकारा येथे कुर्डीश दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 34 जणांचा मृत्यू
फेब्रुवारी 2016 - अंकारा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू
जानेवारी 2016 - इस्तंबूलमध्ये संशयित आएसच्या आत्मघाती हल्ल्यात 12 जर्मन नागरिकांचा मृत्यू
ऑक्टोबर 2015 - अंकारा येथे शांतता रॅलीदरम्यान करण्यात आलेल्या दोन आत्मघाती हल्ल्यात 100 हून अधिक जणांचा मृत्यू.
 
 

Web Title: Suicide attack in Istanbul kills 5 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.