Suicide Bomb Attack: ईदपूर्वी इराकमध्ये आत्मघातकी हल्ला, 35 जणांचा मृत्यू तर 60 पेक्षा जास्त जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 05:25 PM2021-07-20T17:25:01+5:302021-07-20T17:26:06+5:30

Iraq Suicide Bomb Attack: IS च्या दहशतवाद्याने बाजारात स्वतःला उडवलं

A suicide bomber has killed at least 35 Iraqi people and wounded more than 60 others | Suicide Bomb Attack: ईदपूर्वी इराकमध्ये आत्मघातकी हल्ला, 35 जणांचा मृत्यू तर 60 पेक्षा जास्त जखमी

Suicide Bomb Attack: ईदपूर्वी इराकमध्ये आत्मघातकी हल्ला, 35 जणांचा मृत्यू तर 60 पेक्षा जास्त जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देमागील सात महिन्यात IS ने इराकमध्ये तीन हल्ले केले


इराकच्या सदर शहरात दहशतवाद्यानं केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 35 नागरिकांचा मृत्यू झालाय तर 60 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. हल्ला सोमवारी सायंकाळी झाला. इराकमध्ये मंगळवारी ईद असल्यामुळे बाजारात मोठी गर्दी होती, याचाच फायदा दहशतवाद्यांनी घेतला. दहशतवादी संघटना IS नं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

या हल्ल्यानंतर इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-काधेमींनी सुरक्षा कमांडर्सची आपतकालीन बैठक बोलावली आहे. तर, राष्ट्रपती बरहाम सालेह यांनी सोशल मीडियाद्वारे दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले की, घडलेली घटना अत्यंत वाईट आहे. काही जणांनी ईदमुळे झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन आत्मघाती हल्ला केला. आता जोपर्यंत दहशतवाद मुळापासून संपत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत.

7 महीन्यात IS चा तिसरा हल्ला
याच वर्षी एप्रिलमध्ये IS ने इराकच्या सदर शहातील एका बाजारात हल्ला केला होता. त्यात 4 जणांचा मृत्यू झाला होता तर 20 जखमी झाले होते. त्यापूर्वी, जानेवारीमध्ये सेंट्रल बगदाद तायारन स्क्वायर मार्केटमध्ये झालेल्या सुसाइड बॉम्ब अटॅकची जबाबदारीही IS ने घेतली होती. त्या हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला होता.
 

Web Title: A suicide bomber has killed at least 35 Iraqi people and wounded more than 60 others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.