काबुलमधील आत्मघाती स्फोटात 24 जणांचा मृत्यू
By Admin | Published: April 19, 2016 01:56 PM2016-04-19T13:56:21+5:302016-04-19T13:56:21+5:30
पुली महमूद खान परिसरात करण्यात आलेल्या आत्मघाती स्फोटात 24 जणांचा मृत्यू झाला आहे
ऑनलाइन लोकमत -
काबूल, दि. १९ - पुली महमूद खान परिसरात करण्यात आलेल्या आत्मघाती स्फोटात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. 200 हून अधिक जण हल्ल्यात जखमी झाले असून आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती अफगाणिस्तान प्रसारमाध्यमांनी दिली आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तींना सेवा पुरवणा-या गुप्त सेवा दलाच्या कार्यालयाबाहेर आत्मघाती हल्लेखोराने गाडीत हा स्फोट घडवून आणला. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.
आत्मघाती हल्लेखोराने अगोदर गेटवर स्फोट घडवून आणला. त्यानंतर हल्लेखोरांनी फायरिंग करण्यास सुरुवात केली. अफगाणिस्तान पोलिसांना दहशतवाद्यांना ठार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला असून अजून दोन दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. त्यांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे.
भारतीय दुतावासापासून तीन किमी अंतरावर हा स्फोट झाला. भारतीय दुतावासातील सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. तसंच अमेरिकी दुतावासदेखील जवळच आहे. अमेरिकी दुतावासाचेदेखील काहीच नुकसान झालेलं नाही. स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचं अमेरिकी दुतावासामधून दिसत होतं. नाटोचे मुख्यालयदेखील जवळच आहे. मुख्यालयदेखील सुरक्षित आहे. स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Today's terrorist attack near Pul-e-Mahmud Khan, #Kabul clearly shows the enemy's defeat in face-to-face battle with ANSDF.
— ارگ (@ARG_AFG) April 19, 2016
Heavy security deployment in Kabul (Afghanistan) after suicide bombing that killed at least 24 ppl (Source: Reuters) pic.twitter.com/HPvnbpkRoX
— ANI (@ANI_news) April 19, 2016