सीरियामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, 100 जणांचा मृत्यू

By admin | Published: April 16, 2017 07:57 AM2017-04-16T07:57:50+5:302017-04-16T07:57:50+5:30

सीरियामध्ये आत्मघाती कार बॉम्बस्फोटात 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आहे.

Suicide bombs in Syria, 100 deaths | सीरियामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, 100 जणांचा मृत्यू

सीरियामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, 100 जणांचा मृत्यू

Next
>ऑनलाइन लोकमत
अलेप्पो, दि. 16 - सीरियामध्ये आत्मघाती कार बॉम्बस्फोटात 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आहे. यामध्ये नागरिकांना घेऊन जात असलेल्या बस गाड्यांना लक्ष्य करण्यात आलं. या नागरिकांना येथील दोन शहरांतून सुरक्षितपणे दुस-या ठिकाणी हलवण्यात येत होतं. 
 
द सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राइट्सनुसार आत्मघाती हल्लेखोर एक व्हॅन चालवत होता. त्यामध्ये स्फोटाची सामग्री होती, नागरिकांना घेऊन जाणा-या बसेसजवळ येऊन त्याने स्फोट घडवून आणला. यामध्ये 100 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले. सीरियन अपोजिशन रेस्क्यू सर्विसनुसार सरकार आणि कट्टरतावाद्यांमध्ये झालेल्या करारानुसार पश्चिमी अलेप्पो येथील फुआ आणि कफराया या शहरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत होतं, त्यावेळी हा हल्ला झाला.  जखमींची नेमकी आकडेवारी कळू शकलेली नाही.  याघटनेत मृतकांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 
कोणत्याही दहशतवादी संघटनेने अजून या आत्मघाती हल्याची जबाबदारी घेतलेली नाही, मात्र येथील सरकारी टीव्हीने हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहे.   
 
एक आठवड्यापूर्वी सीरियामध्ये रासायनिक हल्ला झाला होता. त्यामध्येही 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता.  
 

Web Title: Suicide bombs in Syria, 100 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.