इस्लामाबादमध्ये आता न शिरता हाहाकार करु शकते ब्रह्मोस मिसाइल, पाक राष्ट्रपतीही घाबरले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 10:50 AM2022-05-13T10:50:27+5:302022-05-13T10:55:18+5:30

Sukhoi Fighter Jet Armed With Brahmos Missile: भारताचे सुखोई लढाऊ विमान आता पाकिस्तानात प्रवेश न करता ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या मदतीने इस्लामाबादपर्यंत पोहोचू शकते.

Sukhoi Fighter Jet Armed With Brahmos Missile Can Destruction Without Entering Islamabad Pakistan President Afraid | इस्लामाबादमध्ये आता न शिरता हाहाकार करु शकते ब्रह्मोस मिसाइल, पाक राष्ट्रपतीही घाबरले!

इस्लामाबादमध्ये आता न शिरता हाहाकार करु शकते ब्रह्मोस मिसाइल, पाक राष्ट्रपतीही घाबरले!

googlenewsNext

इस्लामाबाद-

भारतीय हवाई दलाने गुरुवारी पाकिस्तान आणि चीनविरुद्ध आपल्या लांब पल्ल्याच्या मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या क्षमतेत लक्षणीय वाढ केली आहे. भारतानं बंगालच्या उपसागरात सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानातून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या अपग्रेडेड व्हर्जनची यशस्वी चाचणी घेतली. याआधीच्या २९० किमीच्या तुलनेत आता नवीन क्षेपणास्त्राचा पल्ला तब्बल ४५० किमी असू शकतो. हे तेच ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र आहे ज्याची पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांना भीती वाटते आणि त्यांनी यापूर्वीही उघडपणे आपली भीती व्यक्त केली होती.

भारताचे सुखोई फायटर जेट हवेत इंधन न भरता १५०० किमीपर्यंत मारा करू शकते. या नवीन ब्रह्मोस क्षेपणास्त्रानं सुसज्ज असताना हे लढाऊ विमान सुमारे २ हजार किमीपर्यंत मारा करू शकतं. अशाप्रकारे, भारतीय हवाई दलानं आता जमिनीवर आणि समुद्रावर लांब पल्ल्याचा मारा करण्याची क्षमता प्राप्त केली आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या मदतीनं शत्रूचं अत्यंत महत्त्वाचं लष्करी तळ, अंडरग्राऊंड बंकर, कमांड अँड कंट्रोल सेंटर्स, समुद्रातील विमानवाहू जहाजं आणि युद्धनौका अगदी सहज नष्ट करता येतात. ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा आणखी एक प्रकार बनवला जात आहे ज्याची मारक क्षमता तब्बल ८०० किमी असणार आहे. हे क्षेपणास्त्र आवाजाच्या तिप्पट वेगानं मारा करू शकतं.

पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनाही ब्रह्मोसची भीती
ब्रह्मोसच्या मजबूत ताकदीमुळे पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी देखील घाबरले आहेत. नुकतंच पाकिस्तानी हवाई दलातील मिराज फायटर जेटला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाकिस्तानी राष्ट्रपतींनी भारताने ब्रह्मोस-२ क्षेपणास्त्र बनवल्याचा उल्लेख केला होता. या क्षेपणास्त्राचा वेग ८.५ मॅक इतकी आहे. याचा अर्थ ध्वनीच्या वेगापेक्षा ८.५ पट जास्त. ब्रह्मोस क्षेपणास्त्र काही मिनिटांत पाकिस्तानात घुसू शकतं. आपल्याला आपल्या स्वयंघोषित शत्रूविरुद्ध आपला बचाव मजबूत करण्याची गरज आहे, असं आरिफ अल्वी म्हणाल होते.

पाकिस्तानी राष्ट्रपतींनी देशाच्या हवाई दलाचे कौतुक केलं होतं. पाकिस्तानी वायुसेना प्रतिकूल परिस्थितीतही देशाचं रक्षण करण्यास सक्षम आहे. त्यांनी असा दावा केला की पीएएफने काही वेळा मर्यादित संसाधनं असूनही आपली क्षमता सिद्ध केली आहे, विशेषत: भारताच्या गैरप्रकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे असं ते म्हणाले होते. पाकिस्ताननं नुकतीच चीनकडून हवाई संरक्षण प्रणाली खरेदी केली आहे, जी भारताच्या S-400 ला उत्तर असल्याचं मानलं जातं आहे.

Web Title: Sukhoi Fighter Jet Armed With Brahmos Missile Can Destruction Without Entering Islamabad Pakistan President Afraid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.