ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे सुनक?; बोरिस जॉन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठी दडपण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 07:14 AM2022-01-15T07:14:17+5:302022-01-15T07:14:52+5:30

ऋषी हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत तसेच कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते व ब्रिटनचे वित्तमंत्री आहेत.

Sunak of Indian descent as the Prime Minister of Britain ?; Boris Johnson pressured to resign | ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे सुनक?; बोरिस जॉन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठी दडपण

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे सुनक?; बोरिस जॉन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठी दडपण

Next

लंडन : कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असताना पार्टीत सामील होणारे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षातील काही नेते व विरोधक करत आहेत. बोरिस यांना पायउतार व्हावे लागले तर ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

ऋषी हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत तसेच कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते व ब्रिटनचे वित्तमंत्री आहेत. २०२० मध्ये कोरोनामुळे ब्रिटनमध्ये लॉकडाऊन सुरू असताना पंतप्रधान बोरिस जॉन्सन एका गार्डन पार्टीमध्ये सामील झाले होते. ही पार्टी पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी झाली होती. लॉकडाऊनच्या नियमांचा पंतप्रधानच भंग करत असतील तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवणार, असा सवाल टीकाकारांनी केला. 

अत्यंत उच्चशिक्षित वित्तमंत्री

ब्रिटनचे विद्यमान वित्तमंत्री ऋषी सुनक यांनी विचेंस्टर कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून आणखी उच्चशिक्षण घेतले तसेच अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले आहे. ब्रिटनमधील राजकारणात येण्यापूर्वी ऋषी यांनी ग्लोडमन सॅक्स, हेज फंड येथे काम केले होते. त्यानंतर त्यांनी इन्व्हेस्टमेंट कंपनी सुरू केली. त्यांचे वडील डॉक्टर होते व आई औषधाचे दुकान चालवत होती. हे कुटुंब मूळचे पंजाबचे आहे.

Web Title: Sunak of Indian descent as the Prime Minister of Britain ?; Boris Johnson pressured to resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.