सुनीता, तुझे सलाम...! नऊ महिन्यांच्या मुक्कामात ४,५७६ वेळा पृथ्वीला घातल्या प्रदक्षिणा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 07:20 IST2025-03-20T07:19:32+5:302025-03-20T07:20:26+5:30

तब्बल २८६ दिवस अंतराळ स्थानकात मुक्काम केल्यानंतर परतले पृथ्वीवर...

Sunita orbited the Earth 4,576 times during your nine-month stay | सुनीता, तुझे सलाम...! नऊ महिन्यांच्या मुक्कामात ४,५७६ वेळा पृथ्वीला घातल्या प्रदक्षिणा  

सुनीता, तुझे सलाम...! नऊ महिन्यांच्या मुक्कामात ४,५७६ वेळा पृथ्वीला घातल्या प्रदक्षिणा  


केप केनवेरल : जवळपास नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर हे अंतराळवीर भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे पृथ्वीवर दाखल झाले. त्यांना  घेऊन निघालेले ‘स्पेसएक्स' यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून निघाल्यानंतर काही तासांनी फ्लोरिडा पॅनहँडलच्या तेलाहासे जलक्षेत्रात सुरक्षित उतरले. त्यानंतर जवळपास तासभराने अंतराळवीरांना यानातून बाहेर काढण्यात आले. त्यावेळी सुनीता विल्यम्स व त्यांच्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात होता. ही मोहीम यशस्वी झाल्याबद्दल जगभरातून सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी केला १२ कोटी १० लाख मैलांचा प्रवास 
नऊ महिन्यांच्या मुक्कामात ४,५७६ वेळा पृथ्वीला घातल्या प्रदक्षिणा  
तब्बल २८६ दिवस अंतराळ स्थानकात मुक्काम केल्यानंतर परतले पृथ्वीवर  

अंतराळवीरांच्या कधीही हार न मानण्याच्या भावनेने सर्वांना प्रेरित केले आहे.  
द्रौपदी मुर्मु, राष्ट्रपती 

अंतराळवीरांनी दृढ निश्चयाचा खरा अर्थ काय असतो, हे दाखवून दिले आहे. 
नरेंद्र मोदी, पंतप्रधान

अंतराळवीर फ्लोरिडाच्या समुद्रात सुरक्षित उतरले. आम्ही दिलेले वचन पूर्ण केले. 
डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष. अमेरिका

फ्लोरिडाच्या समुद्रात याच ठिकाणी भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे साडेतीन वाजता स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सूल सुरक्षित उतरले आणि सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर हे तब्बल नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर परतल्याचा आनंद अवघ्या जगाला झाला.  

Web Title: Sunita orbited the Earth 4,576 times during your nine-month stay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.