सुनीता अंतराळ स्थानकातून करणार मतदान; अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांत ठरणार आगळा क्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 05:26 AM2024-09-15T05:26:01+5:302024-09-15T05:27:11+5:30
अंतराळात जास्त काळ राहिल्यास हाडे ठिसूळ होतात. त्यावर कशी मात करता, यासंदर्भात सुनीता म्हणाल्या की, आम्ही दरराेज प्रचंड व्यायाम करताे. दैनंदिन वेळापत्रकाचे काटेकाेर पालन करताे. दैनंदिन व्यायामात ट्रेडमिल, कार्डिओव्हॅस्कुलर, स्क्वॅट्स व इतर प्रकारांचा समावेश असताे.
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अंतराळवीर सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे अंतराळातून मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका पत्रकार परिषदेतील प्रश्नांना थेट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून उत्तरे देताना त्यांनी हे वक्तव्य केले.
पृथ्वीवर परतण्याबाबत बुच विल्माेर यांनी सांगितले की, एकवेळ अशी आली हाेती, ज्यावेळी आम्हाला वाटले की, स्टारलायनरसाेबत आम्हाला परतता येईल. मात्र, आणखी वेळ मिळाला असता तर आम्ही परत येऊ शकलाे असताे.
हाडांच्या ठिसूळतेच्या प्रश्नावर सुनीता म्हणाल्या...
अंतराळात जास्त काळ राहिल्यास हाडे ठिसूळ होतात. त्यावर कशी मात करता, यासंदर्भात सुनीता म्हणाल्या की, आम्ही दरराेज प्रचंड व्यायाम करताे. दैनंदिन वेळापत्रकाचे काटेकाेर पालन करताे. दैनंदिन व्यायामात ट्रेडमिल, कार्डिओव्हॅस्कुलर, स्क्वॅट्स व इतर प्रकारांचा समावेश असताे.
नासाने केले संशोधन
बुच विल्मोर यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतदान प्रक्रिया आम्ही नीट पार पाडू.
अंतराळातून कसे मतदान करता येईल याबाबत नासाने काही संशोधन केले आहे. अंतराळ स्थानकातून मतदान करणे ही आगळी घटना असेल असे सुनीता यांनी सांगितले.
अंतराळ आवडते...
अंतराळात राहणे मला आवडते. मात्र, आपल्याशिवाय बोईंग स्टारलाइनर पृथ्वीवर परत जात असल्याचे पाहून मला थोडे दु:ख झाले, असेही सुनीता विल्यम्स यांनी सांगितले.