कधी आणि कुठे पाहता येणार सुनिता विल्यम्स यांच्या परतीच्या प्रवासाचे लाईव्ह स्ट्रीमिंग? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 14:41 IST2025-03-18T14:39:50+5:302025-03-18T14:41:37+5:30

Sunita Williams Return : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतत आहेत.

Sunita Williams Return: When and where can you watch the live streaming of Sunita Williams' return journey? | कधी आणि कुठे पाहता येणार सुनिता विल्यम्स यांच्या परतीच्या प्रवासाचे लाईव्ह स्ट्रीमिंग? जाणून घ्या

कधी आणि कुठे पाहता येणार सुनिता विल्यम्स यांच्या परतीच्या प्रवासाचे लाईव्ह स्ट्रीमिंग? जाणून घ्या

NASA Sunita Williams Return : मागील 9 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात(ISS) अडकल्या भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या घरवापसीला आता काही तास उरले आहेत. अलीकडेच या दोघांना परत आणण्यासाठी SpaceX चे कॅप्सूल Crew-9 पाठवण्यात आले होते. आता हे यान उद्या(19 मार्च 2025) पहाटेपर्यंत सुनिता आणि बुच यांना घेऊन पृथ्वीवर परतणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून अनडॉक झाले असून, भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे 3.30 वाजता समुद्रात उतरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचे लक्ष या यानाच्या परतीच्या प्रवासाकडे लागले आहे. विशेष म्हणजे, हा परतीचा प्रवास सामान्य नागरिकांनाही पाहता येणार आहे. अमेरिकन अंतराळ संस्था NASA या परतीच्या प्रवासाची लाईव्ह स्ट्रीमिंग दाखवणार आहे.

कुठे आणि कधी पाहता येणार Live स्ट्रीमिंग?
नासाने सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या पृथ्वीवर उतरण्याची तारीख, वेळ आणि ठिकाण निश्चित केले आहे. नासा या अंतराळवीरांच्या पृथ्वीवर परतण्याच्या फ्लाइटचे थेट कव्हरेज दाखवणार आहे. याची सुरुवात भारतीय वेळेनुसार मंगळवारी (18 मार्च) सकाळी 8:15 वाजता किंवा ईस्टर्न टाइम झोननुसार सोमवारी (17 मार्च) रात्री 10:45 वाजता सुरू झाली आहे. या प्रवासाचे थेट प्रक्षेपण एजन्सीच्या विनामूल्य स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म NASA+ (पूर्वी NASA TV) वर दाखवले जाणार आहे. याशिवाय, plus.nasa.gov वर देखील हे विनामूल्य पाहता येईल. 

याव्यतिरिक्त, NASA प्रोग्रामिंग स्पेस एजन्सीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X, Facebook, YouTube आणि Twitch वर विनामूल्य पाहता येईल. Roku, Hulu, DirecTV, Dish Network, Google Fiber, Amazon Fire TV आणि Apple TV यांसारख्या थर्ड-पार्टी प्लॅटफॉर्म्सवरही याची लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल, पण त्यासाठी त्या-त्या प्लॅटफॉर्मची फी भरावी लागेल.

यान कुठे उतरणार?
नासाच्या माहितीनुसार, हे यान फ्लोरिडाच्या किनारपट्टीजवळ समुद्रात उतरू शकते. नासाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरााच्या हवामान आणि स्प्लॅशडाउन परिस्थितीचे परीक्षण केले आहे. मिशन मॅनेजर या क्षेत्रातील हवामानाच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवतील. याचे कारण म्हणजे, ड्रॅगन स्पेसक्राफ्टचे अनडॉकिंग अनेक घटकांवर अवलंबून असते. यामध्ये स्पेसक्राफ्टची तयारी, रिकव्हरी टीमची तयारी, हवामान, समुद्राची परिस्थितीसह अनेक घटकांचा समावेश होतो. 

Web Title: Sunita Williams Return: When and where can you watch the live streaming of Sunita Williams' return journey?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.