सुनीता विल्यम्स अवकाशातून परतण्याचा मार्ग मोकळा; काही दिवसातच पृथ्वीवर येणार, महिनाभरापासून अडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 04:09 PM2024-07-28T16:09:16+5:302024-07-28T16:12:33+5:30
Sunita Williams: अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांचा परतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बोइंगचे स्टारलाइन अंतराळयान लवकरच परतीसाठी उड्डाण करणार आहे.
Sunita Williams: अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांचा आता परतीचा ार्ग मोकळा झाला आहे. बोइंगचे स्टारलाइन अंतराळयान लवकरच परतीसाठी उड्डाण करणार आहे. RCS थ्रस्टर्सच्या यशस्वी चाचणीनंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकले आहेत. यानंतर दोघांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर तैनात असलेल्या अंतराळ यानाशी संबंधित काही महत्त्वाच्या चाचण्या घेण्यात आल्या. फ्लाइट डायरेक्टर कोल मेहरिंग यांच्या मार्गदर्शनाखाली या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचणीचे निकाल सकारात्मक आले आहेत त्यामुळे अंतराळवीर लवकरच परत येऊ शकतात.
WhatsApp आलं नवीन पॉवरफुल फीचर, सहज फोटो अन् व्हिडिओ निवडू शकता
याबाबत फ्लाइट डायरेक्टर मेहरिंग यांनी माहिती दिली. ते म्हणाले, स्टारलाइनर आणि आयएसएस टीमने यशस्वी चाचणी घेतली आहे. दोन्ही चाचण्यावर समाधानी आहे. यावेळी अंतराळवीर विल्यम्स आणि विल्मोर हे देखील स्टारलाइनर कॅलिप्सोवर होते. दोघेही ग्राउंड टीमला रिअल टाइम फीडबॅक देत होते. सुनीता विल्सम्स आणि विल्मोर दोन चाचण्यांमध्ये सहभागी होतील. सुरक्षित लँडिंग करण्यासाठी पुढील आठवड्यात चाचणी होईल.
लवकरच परतणार
याशिवाय पुढील आठवड्यात उड्डाण चाचणी तयारीचा आढावाही घेण्यात आला आहे. यामध्ये हॉट फायर टेस्टशी संबंधित डेटा तपासला जाईल. मात्र, परतीची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण सुनीता विल्यम्स ऑगस्टमध्ये पृथ्वीवर परततील असा अंदाज आहे. हे दोन्ही अंतराळवीर सात दिवसांच्या मोहिमेवर गेले होते. स्टारलाइनर मानवी मोहिमांसाठी योग्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी हे लोक स्टारलाइनरमधून गेले मात्र, अंतराळ यानात तांत्रिक अडचण आल्याने त्यांचा परतीचा प्रवास लांबणीवर पडला.