आठ महिन्यांपासून अवकाशात असलेल्या सुनीता विल्यम्स मार्चमध्ये पृथ्वीवर येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 07:53 IST2025-02-15T07:53:04+5:302025-02-15T07:53:26+5:30

इथे सर्व काही सुरळीत पार पडले तर पॅराशूटच्या मदतीने उतरणाऱ्या कॅप्सूलमधून सुनीता व बूच सुरक्षित उतरतील.

Sunita Williams, who has been in space for eight months, will return to Earth in March. | आठ महिन्यांपासून अवकाशात असलेल्या सुनीता विल्यम्स मार्चमध्ये पृथ्वीवर येणार

आठ महिन्यांपासून अवकाशात असलेल्या सुनीता विल्यम्स मार्चमध्ये पृथ्वीवर येणार

वॉशिंग्टन : तब्बल आठ महिन्यांपासून अवकाशात अडकून पडलेली भारतीय वंशाची अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बूच विल्मोर १९ मार्चपर्यंत पृथ्वीवर परतणार आहेत. इलॉन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’च्या ड्रॅगन कॅप्सूलमधून ते परततील.

केवळ आठ दिवसांच्या मोहिमेवर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर रवाना झालेल्या सुनीता आणि बूच यांच्या परतीच्या मार्गात प्रचंड अडथळे आले, बोइंगच्या स्टारलायनर कॅप्सूलमधून गेल्या ५ जून रोजी स्थानकावर रवाना झालेले दोघे आठ महिन्यांपासून दोघे अवकाशात अडकून पडले आहेत. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांना या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते.
या वातावरणात अवकाश यानाचा प्रवेश सर्वात जोखिमीचा. इथे सर्व काही सुरळीत पार पडले तर पॅराशूटच्या मदतीने उतरणाऱ्या कॅप्सूलमधून सुनीता व बूच सुरक्षित उतरतील.

..परतीची मोहीम
स्पेस एक्सच्या ड्रॅगन कॅप्सूल ‘क्रू-१०’चा हा प्रवास अत्यंत जोखमेचा असेल. कारण यानाचा वेग असेल ताशी २८ हजार किमी तापमान निर्माण होईल सुमारे १५०० अंश. पृथ्वीकक्षेत प्रवेशानंतर याचा वेग कमी व्हायला प्रारंभ होईल. हे टप्पे नियोजितपणे पार पडले तर पॅराशूटने कॅप्सूल पृथ्वीवर उतरेल. परंतु, यात काही उणिवा राहिल्या तर मात्र ती सर्वात मोठी जोखीम ठरेल. 

क्रू-१० : १२ मार्चला होणार रवाना
१२ मार्चला क्रू-१० यान ड्रॅगन कॅप्सूलसह लाँच होईल. अवकाश स्थानकावर ॲनी मॅक्लेन, निकोल एअर्स, ताकुया ओनिशी आणि रोस्कोस्मोस या चौघांना सोडून सुनीता व बूच यांना घेऊन ते परतेल. क्रू घेऊन हे यान रवाना होईल. सुनीता विल्यम्स या मोहिमेत प्रयोगशाळेची कमांडर आहे. तिला आपला कार्यभार नवीन कमांडरकडे सोपवण्यास ५ ते ७ दिवस लागू शकतात. या दृष्टीने १९ मार्चपर्यंत ती पृथ्वीवर परतणे अपेक्षित आहे.

४०० किमी पृथ्वीपासून दूर आहे अवकाश स्थानक 
१०० किमी अंतरात पृथ्वीपासून आकाशात आहे वातावरण, ०३  तास लागतील वातावरणात प्रवेशानंतर जमिनीवर उतरण्यास

Web Title: Sunita Williams, who has been in space for eight months, will return to Earth in March.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.