सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या मार्गात मोठ्या अडचणी; आता थेट 2025 मध्येच पृथ्वीवर परतणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 07:00 PM2024-08-09T19:00:49+5:302024-08-09T19:01:18+5:30

5 जूनपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या मार्गात मोठ्या अडचणी असल्याचे NASA च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Sunita Williams's troubles escalated; Now she will directly return to earth in 2025 | सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या मार्गात मोठ्या अडचणी; आता थेट 2025 मध्येच पृथ्वीवर परतणार

सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या मार्गात मोठ्या अडचणी; आता थेट 2025 मध्येच पृथ्वीवर परतणार

वॉशिंग्टन: अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स (sunita williams) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. NASA च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बोईंग स्टारलाइनरद्वारे जून महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेल्या सुनीता यांच्या परतीच्या मार्गात मोठ्या अडचणी आल्यामुळे त्या थेट पुढील वर्षीच पृथ्वीवर परतू शकतात. एजन्सी आता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना SpaceX स्पेसक्राफ्टच्या मदतीने पृथ्वीवर आणण्यासाठी पर्याय शोधत आहे.

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अवघ्या आठ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहून परतणार होते. पण, अचानक त्यांच्या परतीच्या मार्गात काही तांत्रिक अडचणी आल्या, ज्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून दोघेही अंतराळात अडकले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, आता ते दोघेही थेट 2025 मध्येच पृथ्वीवर परत येऊ शकतात. बोईंग स्टारलाइनद्वारे त्यांना परत आणले जाऊ शकत नाही, त्यामुळे आता इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या SpaceX कंपनीची मदत घेतली जाणार आहे. 

सुनीता विल्यम्स जूनपासून अंतराळात आहेत
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी 5 जून रोजी बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानातून उड्डाण केले होते. ते आठवडाभर अंतराळात राहून जूनच्या मध्यात परतणार होते, पण थ्रस्टर आणि हेलियम लीकच्या समस्येमुळे त्यांना परत येता आले नाही. 

सुनीता विल्यम्स यांचे Muscle mass आणि Bone density घटले
अनेक दिवसांपासून अंतराळात राहिल्यामुळे सुनीता विल्यम्स यांच्या शरीरावर परिणाम होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंतराळातील गुरुत्वाकर्षणाच्या कमतरतेमुळे सुनीता यांचे Muscle mass आणि  Bone density कमी होत आहे. 

Web Title: Sunita Williams's troubles escalated; Now she will directly return to earth in 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.