इराकच्या हवाई तळावर सुन्नी बंडखोरांचा हल्ला

By admin | Published: June 26, 2014 01:43 AM2014-06-26T01:43:59+5:302014-06-26T01:43:59+5:30

इराकचे तुकडे करण्याच्या उद्देशाने आक्रमण करणा:या सुन्नी बंडखोरांनी आज इराकमधील सर्वात मोठय़ा हवाई तळावर हल्ला केला आहे.

Sunni rebels attack on Iraq's airspace | इराकच्या हवाई तळावर सुन्नी बंडखोरांचा हल्ला

इराकच्या हवाई तळावर सुन्नी बंडखोरांचा हल्ला

Next
>बगदाद : इराकचे तुकडे करण्याच्या उद्देशाने आक्रमण करणा:या सुन्नी बंडखोरांनी आज इराकमधील सर्वात मोठय़ा हवाई तळावर हल्ला केला आहे. अमेरिकेच्या सल्लागारांचे पथक इराकमध्ये पोहोचले असून, बंडखोरांच्या आक्रमकतेवर नियंत्रण आणण्यासाठी इराकच्या सैनिकांना मदत करण्यास सरसावले आहे. 
गेल्या दोन आठवडय़ांपासून अल काईदाची शाखा असणारे हे बंडखोर  इराकचा भूभाग बळकावत असून, अमेरिकेचे सैन्य देशातून बाहेर पडल्यानंतर अडीच वर्षानी देश कोसळण्याच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. इस्लामिक स्टेट इन इराक अँड लेव्हंट (आयएसआयएल) या संघटनेचे बंडखोर याथ्रिब शहरात सुरक्षा दलाशी लढत आहेत. या शहराच्या जवळच मोठा हवाई तळ आहे. अमेरिकेच्या हल्ल्याच्या काळात कॅम्प अॅनाकोंडा नावाने प्रसिद्ध असणा:या या तळाला बंडखोरांनी वेढा घातला आहे.  (वृत्तसंस्था)
 
 
4दुबई : इराकमधील सुन्नी बंडखोरांच्या समर्थकांनी ऑनलाईन इशारा दिला असून, अमेरिकेने इराकमधील बंडखोरांवर हवाई हल्ला केल्यास  आम्हीही अमेरिकन नागरिकांवर हल्ले करू असे म्हटले आहे. 
 
 
 

Web Title: Sunni rebels attack on Iraq's airspace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.