सुन्नी बंडखोरांनी जाहीर केले खलिफाचे साम्राज्य
By admin | Published: July 1, 2014 02:21 AM2014-07-01T02:21:53+5:302014-07-01T02:21:53+5:30
बंडखोरांनी ताब्यात असलेल्या प्रदेशात खलिफाचे साम्राज्य स्थापन केल्याची घोषणा केली आहे. इराक व सिरियात बंडखोरांनी जिंकलेला प्रदेश या साम्राज्यात असेल.
Next
>बगदाद : इराकमधील दहशतवादाने सोमवारी वेगळे वळण घेतले असून, अल काईदा या दहशतवादी संघटनेचाच भाग असणा:या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (आयएसआयएस) च्या बंडखोरांनी ताब्यात असलेल्या प्रदेशात खलिफाचे साम्राज्य स्थापन केल्याची घोषणा केली आहे. इराक व सिरियात बंडखोरांनी जिंकलेला प्रदेश या साम्राज्यात असेल. आयएसआयएस संघटनेचा प्रमुख अबू बक्र अल बगदादी हा पहिला खलिफा असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे. आपल्या संघटनेचेही नाव त्यांनी बदलले असून ते आता इस्लामिक स्टेट असे आहे.
सिरियाच्या उत्तरेकडील अलेप्पो ते इराकमधील दियाला प्रांत ही या साम्राज्याची सीमा आहे, असे बीबीसीने म्हटले आहे, तसेच मुस्लिम नागरिकांनी लोकशाहीचा व इतर पाश्चात्त्य कल्पनांचा निषेध करावा आणि नव्या खलिफाचे अल बगदादी याचे नेतृत्व मान्य करावे, असे आवाहनही या संघटनेने केले आहे. सुन्नी बंडखोरांनी ही घोषणा रमजानच्या पहिल्या दिवशी ऑनलाईन केली आहे.
या ऑनलाईन घोषणोचे रेकॉर्डिग करण्यात आले असून, त्यात आयएसआयएस संघटनेचा प्रवक्ता अबू मोहंमद अल अदनानी याने खलिफांच्या साम्राज्यात इस्लामी कायद्यानुसार निधी उभारणो,
पुरस्कार, दंड व प्रार्थना असतील, असे सांगितले.
खलिफांचे साम्राज्य अस्तित्वात आल्यानंतर इतर अमिराती, संघटना, राज्ये, समूह व त्यांचे सैनिक यांचे अस्तित्व राहणार नाही, असे हा प्रवक्ता म्हणाला. (वृत्तसंस्था)