सुपरबग घेईल दरवर्षी 1 कोटी लोकांचा बळी
By Admin | Published: December 12, 2014 02:40 AM2014-12-12T02:40:00+5:302014-12-12T02:40:00+5:30
कोणत्याही औषधाला दाद न देणा:या सुपरबगला वेळीच नियंत्रणात न आणल्यास हा सुपरबग दरवर्षी 1 कोटी लोकांचे जीव घेईल
लंडन : कोणत्याही औषधाला दाद न देणा:या सुपरबगला वेळीच नियंत्रणात न आणल्यास हा सुपरबग दरवर्षी 1 कोटी लोकांचे जीव घेईल आणि त्यासाठी 2क्5क् र्पयत जागतिक अर्थव्यवस्थेला तब्बल 1 हजार अब्ज डॉलरचा फटका बसेल असा इशारा ब्रिटिश सरकारच्या आयोगाने दिला आहे.
आतार्पयत अशा संसर्गाने हजारो लोकांचा बळी घेतला आहे आणि सुपरबगचा विकास होत असल्याचे आढळले आहे. गोल्डमन साच कंपनीचे माजी अर्थशास्त्रज्ञ जेम ओ नील यांनी या संशोधनाचे नेतृत्व केले आहे.
कोणत्याही औषधाला दाद न देणारे विषाणू विकसित झाल्यामुळे धोका अधिकच वाढला आहे. या विषाणूंवर वेळीच नियंत्रण आणणो आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)