कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 09:38 PM2024-11-01T21:38:25+5:302024-11-01T21:39:01+5:30
भारतीय वंशाच्या गगनप्रीत सिंह रंधावालाही याला अटक करण्यात आली आहे.
कॅनडामध्ये आरसीएमपीने मोठी कारवाई केली आहे. मोठ्या अवैध ड्रग पर्दाफाश केला आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधे, रसायने आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच भारतीय वंशाच्या गगनप्रीत सिंह रंधावा या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईचा एक भाग म्हणून, अधिकाऱ्यांनी ५४ किलोग्रॅम फेंटॅनाइल, ३९० किलोग्रॅम मेथाम्फेटामाइन, ३५ किलोग्रॅम कोकेन, १५ किलोग्रॅम एमडीएमए आणि सहा किलोग्राम गांजा जप्त केला.
RCMP चे फेडरल पोलिस प्रमुख सहाय्यक आयुक्त डेव्हिड टेबल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, जप्त करण्यात आलेल्या फेंटॅनाइलच्या ९५ मिलियन संभाव्य प्राणघातक डोसमुळे प्रत्येक कॅनेडियन व्यक्तीचा जीव कमीत कमी दोनवेळा घेऊ शकतो. अंमली पदार्थांव्यतिरिक्त, अधिकाऱ्यांनी डझनभर हँडगन, एआर-शैलीतील असॉल्ट रायफल आणि सबमशीन गनसह ८९ बंदुक जप्त केल्या, यापैकी बरेच लोड केले होते. स्फोटक उपकरणे, मोठ्या प्रमाणात दारूगोळा, सायलेन्सर, शरीर चिलखत जप्त करण्यात आले.
पॅसिफिक प्रदेशातील फेडरल पोलिसिंगचे मीडिया रिलेशन ऑफिसर कॉर्पोरल अरश सईद यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे की, RCMP फेडरल अन्वेषकांनी शुक्रवारी मेट्रो व्हँकुव्हरमध्ये अंमलबजावणी कारवाई केली. ते म्हणाले की, या छाप्यामुळे आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीला मोठा धक्का बसला आहे.
सहाय्यक आयुक्त डेव्हिड तेबोल यांनी सांगितले की, रंधावा यांच्यावर अनेक ड्रग्स आणि फायर आर्म्सचे आरोप आहेत. तपास सुरू असल्याने आणखी अटक होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर औषधांच्या उत्पादन आणि वितरणात गुंतलेल्या आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी गटाची ड्रग सुपर लॅब अनेक महिन्यांच्या तपासानंतर उद्ध्वस्त करण्यात आली आहे.