हमासचे समर्थन भारतीय विद्यार्थिनीला पडले महागात; शैक्षणिक व्हिसा झाला रद्द, पीएचडीसाठी घेतलेला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 08:54 IST2025-03-16T08:53:33+5:302025-03-16T08:54:28+5:30

एफ-१ या विद्यार्थी व्हिसाअंतर्गत शहरी नियोजन या विषयात पीएचडी करण्यासाठी रंजनीने कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला होता. 

Supporting Hamas costly to Indian student dearly; Academic visa cancelled, admission for PhD | हमासचे समर्थन भारतीय विद्यार्थिनीला पडले महागात; शैक्षणिक व्हिसा झाला रद्द, पीएचडीसाठी घेतलेला प्रवेश

हमासचे समर्थन भारतीय विद्यार्थिनीला पडले महागात; शैक्षणिक व्हिसा झाला रद्द, पीएचडीसाठी घेतलेला प्रवेश

वॉशिंग्टन : हिंसा व दहशतवादाला प्रोत्साहन देणे व दहशतवादी संघटना हमासचे समर्थक केल्याचा आरोप अमेरिकेच्या गृहसुरक्षा विभागाने केल्यामुळे रंजनी श्रीनिवासन नामक भारतीय विद्यार्थिनीचा व्हिसा रद्द झाला. रंजनीला शिक्षण अर्धवट सोडून देश सोडावा लागला. एफ-१ या विद्यार्थी व्हिसाअंतर्गत शहरी नियोजन या विषयात पीएचडी करण्यासाठी रंजनीने कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला होता. 

परराष्ट्र विभागाने ५ मार्च रोजी तिचा व्हिसा रद्द केला. त्यामुळे ११ मार्च रोजी रंजनीला देश सोडवा लागला. जर एखादी व्यक्ती हिंसा व दहशतवादाचे समर्थन करत असेल, तर तिला देशात राहण्याची परवानगी नसल्याचे रंजनीचा व्हिसा रद्द करताना डीएचएसने सचिव क्रिस्टी नोएम यांनी स्पष्ट केले. ज्यू विद्यार्थ्यांचा छळ रोखण्यात अपयश आल्याने ट्रम्प प्रशासनाने कोलंबिया विद्यापीठाविरोधात कडक धोरण राबवले. हा प्रकार समोर आल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने विद्यापीठाचे ४०० दशलक्ष डॉलर (३३ अब्ज रुपये) रुपयांचे अनुदान रद्द केले. 

पॅलेस्टिनी विद्यार्थिनीसह आंदोलकाला अटक
कोलंबिया विद्यापीठात एप्रिल २०२४ मध्ये हमास समर्थनात आंदोलन केल्याने पॅलेस्टिनी असलेली विद्यार्थिनी लेका कोर्डिया हिला अमेरिकेच्या स्थलांतर विभागाने अटक केली.
लेका ही विद्यार्थिनी व्हिसाची मुदत संपल्यानंतरही २०२२ पासून अमेरिकेत राहत होती. इस्रालय विरोधातील निदर्शनात सहभागी झाल्याने याच विद्यापीठातील महमूद खलील नामक विद्यार्थ्याला ट्रम्प प्रशासनाने अटक केली आहे.
 

Web Title: Supporting Hamas costly to Indian student dearly; Academic visa cancelled, admission for PhD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.