आश्चर्य, 11 वर्षांच्या मुलानं दिली 12वीची परीक्षा
By admin | Published: March 4, 2017 07:40 AM2017-03-04T07:40:18+5:302017-03-04T07:41:48+5:30
मानवी मेंदूच्या जोरावर एका 11 वर्षांच्या मुलानं असाध्य गोष्ट साध्य करून दाखवली आहे
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 4 - मानवी मेंदूच्या जोरावर एका 11 वर्षांच्या मुलानं असाध्य गोष्ट साध्य करून दाखवली आहे. हैदराबादेतला 11 वर्षांचा मुलगा चक्क 12वीच्या परीक्षेला बसला आहे. अवघ्या 11व्या वर्षी त्यानं 12वीची परीक्षा दिल्यानं सर्वस्तरातून त्याचं कौतुक करण्यात येत आहे.
अगस्त्य जयस्वाल असं या मुलाचं नाव असून, तो युसूफगुडामधील सेंट मेरी ज्युनिअर शाळेत शिक्षणाचे धडे गिरवतो आहे. हैदराबादेतल्याच जुबली हिल्स इथल्या चैतन्य ज्युनिअर कॉलेजमधून होत असलेल्या परीक्षेत त्यानं सहभाग घेतला आहे. माध्यमिक विद्यार्थी असल्यामुळे नागरिक शास्त्र, अर्थशास्त्र आणि वाणिज्य हे त्याचे विषय आहेत.
11व्या वर्षी 12वीची परीक्षा देणं म्हणजे एक प्रकारे त्याला हे मिळालेलं बक्षीसच आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. मात्र अशी संधी मिळालेला तो कुटुंबातील पहिला नाही. अगस्त्य याचा छोटा भाऊ नैना जयस्वाल हा आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू आहे. अगस्त्यचा भाऊ नैना हा सर्वात कमी वयाचा टेबल टेनिस खेळाडू असून, त्यानं पीएचडीसाठी अर्ज केला आहे. तसेच अगस्त्यच्या आईनंही वयाच्या 15व्या वर्षीच उस्मानिया विश्वविद्यालयातून राज्यशास्त्रातून मास्टर्स पूर्ण केले होते. अगस्त्य म्हणाला, मी पाठांतर करत नाही, मात्र उत्तर समजून घेतो आणि मगच लिहितो. मला आयएएस ऑफिसर व्हायचं आहे. मी वयाच्या आठव्या वर्षीच 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालो. अगस्त्याच्या या धाडसामुळे त्याच्यावर स्तुतिसुमनं उधळली जात आहेत.
I don't mug up but understand answers & then write. Want to become IAS officer: Agastya Jaiswal pic.twitter.com/EpIvO7eEsO
— ANI (@ANI_news) March 3, 2017
I completed my class 10th at the age of 8-yrs. Studying in intermediate at the age of 10-years: Agastya Jaiswal #Hyderabadpic.twitter.com/ljGmgY30zH
— ANI (@ANI_news) March 3, 2017