आश्चर्य! १४ वर्षांपासून कोमात असलेल्या महिलेने दिला मुलाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 07:52 AM2019-01-07T07:52:06+5:302019-01-07T07:52:45+5:30

या महिलेने २९ डिसेंबर २०१८ रोजी एका मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे ही महिला गर्भवती असल्याची माहिती कुणालाच कशी झाली नाही

Surprise! A 14-year-old woman gave birth to a child | आश्चर्य! १४ वर्षांपासून कोमात असलेल्या महिलेने दिला मुलाला जन्म

आश्चर्य! १४ वर्षांपासून कोमात असलेल्या महिलेने दिला मुलाला जन्म

Next

न्यूयॉर्क : गत १४ वर्षांपासून कोमात असलेल्या महिलेने एका मुलाला जन्म दिल्याची घटना अमेरिकेत फिनिक्स एरिजोना येथे समोर आली. या घटनेने डॉक्टरांसह सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. तथापि, पोलिसांनी लैंगिक शोषणाची चौकशी सुरू केली आहे.

या महिलेने २९ डिसेंबर २०१८ रोजी एका मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे ही महिला गर्भवती असल्याची माहिती कुणालाच कशी झाली नाही? याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असे सांगण्यात येत आहे की, या महिलेच्या आई-वडिलांचा १४ वर्षांपूर्वी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर ही महिला कोमात गेली. हॅसिंडाचे प्रवक्ते डेव्हिड लिबोविट्ज यांनी सांगितले की, ही घटना बुचकळ्यात टाकणारी आहे. तथापि, याप्रकरणी कर्मचाऱ्यांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे काय? या प्रश्नावर त्यांनी उत्तर देण्यास टाळले. तथापि, याप्रकरणी पुरुष कर्मचाºयांची डीएनए चाचणी करणेच उचित ठरेल, असेही मत व्यक्त होत आहे.

हॉस्पिटल स्टाफलाही माहीत नव्हते
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक नर्स जेव्हा या महिलेच्या खोलीत दाखल झाली तेव्हा या महिलेला वेदना असह्य झाल्या होत्या. त्यानंतर डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. नवजात बाळाची प्रकृती चांगली आहे. न्यूज वेबसाईट ‘एज फॅमिली डॉट कॉमने’हे वृत्त सर्वप्रथम दिले. या वृत्तात म्हटले आहे की, या हॉस्पिटलच्या स्टाफला हे माहीत नव्हते की, ती गर्भवती आहे.

Web Title: Surprise! A 14-year-old woman gave birth to a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.