आश्चर्य ! इराकमधल्या मोसूल शहरात बुरख्यावर बंदी

By admin | Published: September 6, 2016 07:29 PM2016-09-06T19:29:48+5:302016-09-06T19:32:21+5:30

इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया या दहशतवादी संघटनेनं आता मोसूल शहरात महिलांनी बुरखा वापरण्यावर बंदी घातली आहे.

Surprise! Burkha ban in Mosul city of Iraq | आश्चर्य ! इराकमधल्या मोसूल शहरात बुरख्यावर बंदी

आश्चर्य ! इराकमधल्या मोसूल शहरात बुरख्यावर बंदी

Next

ऑनलाइन लोकमत

इराक, दि. 6 - इराकमध्ये नापाक कृत्यांनी धुमाकूळ घालणा-या इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया या दहशतवादी संघटनेनं आता मोसूल शहरात महिलांनी बुरखा वापरण्यावर बंदी घातली आहे. गेल्या आठवड्यात अज्ञात बुरखाधारी व्यक्तींनी मोसूल शहराच्या सुरक्षा केंद्राजवळ इसिसच्या दहशतवाद्यांवर हल्ला केला होता. त्यापार्श्वभूमीवर इसिसनं आता महिलांना बुरख्या परिधान करण्यावरच बंदी घातली आहे. त्यामुळे इराकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मोसूलमधल्या अल शिरकत या सुरक्षा चेक पोस्टवर बुरखाधारी व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला होता. तर दुस-या एका घटनेत बुरखाधारी व्यक्तीनं मोसूलमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांवर हल्ला केला होता. त्यामुळे इसिसनं मोसूल शहरात महिलांना बुरखा परिधान करण्यावर बंदी घातली आहे.

विशेष म्हणजे मोसूल शहरात बाहेर जाण्यापूर्वी महिला स्वतःला पूर्णतः बुरख्यामध्ये झाकून घेतात. इसिस या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी मोसूलमध्ये महिलांना जाळून मारणे. तसेच सार्वजनिक ठिकाणी बुरखाधारी महिलांचे चेहरे लोकांसमोर उघड करण्यासारखे कृत्य करत असतात. अनेक दहशतवादी महिलांना सेक्स करण्यासाठी जोरजबरदस्ती करतात, असा घटना समोर आल्या आहेत.

Web Title: Surprise! Burkha ban in Mosul city of Iraq

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.