आश्चर्य ! 'या' देशाची लोकसंख्या फक्त 27

By admin | Published: October 27, 2016 08:52 PM2016-10-27T20:52:21+5:302016-10-27T20:52:21+5:30

इंग्लंडच्या सफोल्ड या समुद्रकिना-यापासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सीलंड किल्ल्यावर हा देश वसला आहे.

Surprise! The population of this country is only 27 | आश्चर्य ! 'या' देशाची लोकसंख्या फक्त 27

आश्चर्य ! 'या' देशाची लोकसंख्या फक्त 27

Next

ऑनलाइन लोकमत

इंग्लंड, दि. 27 - तुम्हाला असा देश माहीत आहे का ज्याची लोकसंख्या फक्त 27 आहे. जर तुम्हाला माहीत नसल्यास सांगू इच्छितो की, इंग्लंडच्या समुद्रकिना-यालगत सीलँड हा देश आहे. इंग्लंडच्या सफोल्ड या समुद्रकिना-यापासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सीलंड किल्ल्यावर हा देश वसला आहे. दुस-या महायुद्धात इंग्लंडनं या देशाची निर्मिती केली होती. मात्र त्यानंतर त्या देशाला खाली करण्यात आलं. सीलँडवर आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी राज्य केलं आहे.

9 ऑक्टोबर 2012ला रॉय बेट्स नावाच्या व्यक्तीला सीलँडचा राजा घोषित करण्यात आलं होतं. रॉय यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा मुलगा मायकल यांनी राज्य केलं. ज्या देशांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली नसते त्यांना छोटे देश म्हणून संबोधण्यात येते. सीलँड या देशाचे क्षेत्रफळ 250 मीटर (0.25 किलोमीटर) एवढी आहे. भकास अवस्थेत असलेल्या या किल्ल्याला सीलँडसोबत रफ फोर्ट म्हणूनही ओळखले जाते.

या देशाची अर्थव्यवस्था देणग्यांवर चालते आहे. अनेकांना या देशाची माहिती सोशल मीडियावरूनच झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून या देशाला अनेक देणग्याही प्राप्त झाल्या आहेत. मात्र सीलँड या देशाला अधिकृतरीत्या मान्यता न मिळाल्यानं सर्वात छोटा देश म्हणून व्हेटिकन सिटी ओळखला जातो. व्हॅटिकन सिटी क्षेत्रफळ 0.44 वर्ग किलोमीटर आहे. व्हॅटिकन सिटी या देशाची लोकसंख्या 800च्या घरात आहे.

Web Title: Surprise! The population of this country is only 27

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.