चीनला घेरणार? टोकियोतील बैठकीत भारतासह 4 देशांची होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 08:36 AM2022-05-24T08:36:05+5:302022-05-24T08:36:27+5:30
बैठकीत चीनच्या वाढत्या कारवायांना लगाम घालण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे.
भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चारही देशांचा समूह क्वाड म्हणून ओळखला जातो. या चारही देशांच्या प्रमुखांची मंगळवारी, २४ मे रोजी टोकियो येथे बैठक होणार आहे. या बैठकीत चीनच्या वाढत्या कारवायांना लगाम घालण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे.
बैठकीत नेमके काय ठरणार?
nक्वाड देशांच्या प्रमुखांच्या बैठकीत चीनच्या मच्छिमार बोटींना लगाम घालण्याच्या मुद्द्यावर चर्चा आणि निर्णय होणार आहे.
nमच्छिमारीच्या नावाखाली चिनी जहाजे जपानपासूनभारतापर्यंत सर्वांच्या सागरी हद्दीत प्रवेश करून हेरगिरी करत असतात.
काय करतात ही चिनी जहाजे?
nचीनकडे अजस्त्र अशा मच्छिमार बोटींचा ताफा आहे.
nया जहाजांमध्ये चीनचे लष्कर हेरगिरीची उपकरणे ठेवत असते.
nचिनी जहाजांचा हिंदी महासागर, दक्षिण चिनी समुद्र, प्रशांत महासागर या सर्व ठिकाणी संचार असतो.
nमच्छिमारीच्या नावाखाही ही जहाजे या
महासागरांच्या
परिसरातील सर्व देशांवर नजर ठेवण्याचे काम करतात.
nया देशांच्या सागरी हद्दीतील हालचालींचा अहवाल चीनकडे जात असतो.
nचिनी जहाजांच्या या कारवायांना लगाम घालण्यासाठी क्वाड देश त्यांच्यावर लक्ष ठेवणार आहे.
nसिंगापूर, भारत आणि प्रशांत महासागर परिसरात उपलब्ध असलेल्या सर्व्हेलन्स सेंटर्सना तांत्रिकदृष्ट्या जोडून चिनी जहाजांचा माग ठेवला जाईल.
nअमेरिकाही या कामी मदत करणार असून उच्च तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे.
nक्वाड देशांच्या या धोरणाला चीन कसा उत्तर देतो हे पाहणे आता उद्बोधक ठरणार आहे.'