डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी १२ तास तळ ठोकून होता; आरोपीचा खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 11:28 AM2024-09-17T11:28:22+5:302024-09-17T11:29:23+5:30

रविवारी डोनाल्ड ट्रम्प गोल्फ खेळायला गेले असताना त्याठिकाणी त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. यात तपास यंत्रणांनी एकाला अटक केली. 

Suspect in Donald Trump assassination attempt may have lain in wait for 12 hours | डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी १२ तास तळ ठोकून होता; आरोपीचा खळबळजनक खुलासा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी १२ तास तळ ठोकून होता; आरोपीचा खळबळजनक खुलासा

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी आरोपीनं पूर्ण प्लॅनिंग केले होते. आरोपी फ्लोरिडामध्ये गोल्फ कोर्सच्या बाहेर त्याची बंदूक आणि खाद्य साहित्य घेऊन जवळपास १२ तास तळ ठोकून बसला होता. तो ट्रम्प यांची वाट पाहत होता. फ्लोरिडाच्या वेस्ट पाम बीचवर रविवारी जेव्हा ट्रम्प गोल्फ खेळत होते तेव्हा त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न उधळून आरोपीला अटक केली. पकडलेल्या आरोपीचं नाव रयान राऊथ असं आहे. 

हल्ल्यावेळी ट्रम्प गोल्फ खेळत होते आणि काही अंतरावर असलेल्या सीक्रेट सर्व्हिस जवानांनी ४०० मीटर अंतरावर मैदानाच्या झाडाझुडपात रायफलचा काही भाग बाहेर आल्याचं पाहिले. त्यानंतर जवानांनी एक गोळी झाडली तेव्हा आरोपीने रायफल खाली पाडली आणि एसयूवी कारमधून पळण्याचा प्रयत्न केला. आरोपीनं पळण्याच्या नादात २ बॅकपॅक, टार्गेटसाठी वापरलं जाणारं स्कोप आणि एक कॅमेराही घटनास्थळी सोडला. त्यानंतर जवांनांनी पाठलाग करून आरोपीला पकडलं. 

आरोपीनं सांगितला घटनाक्रम

एफबीआयच्या निवेदनानुसार, आरोपी रात्री १ वाजून ५९ मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून ३१ मिनिटांपर्यंत गोल्फ कोर्सजवळ होता. आरोपीनं जबाबात स्वत:ला बेघरांसाठी घरे बनवतो, रशियाविरोधात स्वत:ला वाचवण्यासाठी यूक्रेनला जवानांची भरती करण्याचा प्रयत्न आणि तो ट्रम्पचा द्वेष करत होता असं सांगितले. आरोपीने २०२३ साली यूक्रेन्स अनविनेबल वॉर या पुस्तकात इराणला तुम्ही ट्रम्पची हत्या करण्यासाठी स्वतंत्र आहे असं लिहिलं होते. 

जवळपास १२ तास तो अंधारात झाडीझुडपात गोल्फ क्लबजवळ लपून राहिला होता. आरोपीवर याआधीही २ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. हे दोन्ही प्रकरण उत्तरी कॅरोलिना इथं दाखल आहेत. २००२ मध्ये आरोपी बेकायदेशीर बंदूक ठेवल्याप्रकरणी दोषी आढळला होता त्यात त्याला शिक्षा झाली होती. त्यानंतर २०१० साली त्याला चोरीच्या प्रकरणात दोषी ठरवलं होते. आरोपी हा युक्रेन समर्थक आहे. २०२२ च्या रशियाच्या हल्ल्यानंतर परदेशी जवानांची युक्रेन सैन्यात भरती करण्याचं काम आरोपी करत होता.  
 

Web Title: Suspect in Donald Trump assassination attempt may have lain in wait for 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.