तालिबाननं पंजशीरवर कब्जा केल्याच्या दाव्यावर सस्पेन्स कायम; ताजिकिस्तानमधील अफगाण राजदूत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 11:34 PM2021-09-05T23:34:10+5:302021-09-05T23:35:02+5:30
Taliban Afghanistan Crisis : रविवारी तालिबाननं पंजशीरवरही ताबा मिळवल्याचा केला होता दावा.
संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर पंजशीर हा एकच असा प्रांत होता जिकडे तालिबानला पोहोचता आलं नव्हतं. पंजशीरमधून तालिबांनींना जशासतसं उत्तर देण्यात येत होतं. परंतु आता या प्रांतावरही ताबा मिळवल्याचा दावा तालिबानकडून करण्यात आलाल आहे. पंजशीरच्या प्रत्येक मुख्यालय, पोलीस मुख्यालय आणि सर्व कार्यालयांवर ताबा मिळवण्यात आल्याचा दावा तालिबानच्या प्रवक्त्यानं रविवारी केला.
तर दुसरीकडे अशी माहितीही समोर येत आहे की सेंट्रल पंजशीरवर तालिबाननं कब्जा केला आहे. जनरल जरातनं फ्रन्टला धोका दिला त्यानंतर सेंट्रल पंजशीरवर कब्जा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पंजशीर रोडवर तालिबानचा कब्जा आहे. परंतु खोऱ्यावर नॉर्दन फ्रन्टचा कब्जा असून अगमद मसूद आणि अमरूल्लाह सालेह पंजशीर खोऱ्यात आहेत. पंजशीरच्या दाव्याचं नॉर्दन अलायन्सनं याचं खंडन केलं आहे. तसंच नॉर्दन अलायन्सचं समर्थन करणारे ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तानाचे राजदूत जहीर अघबर यांनी तालिबान आणि नॉर्दन अलायन्सची झटापट झाल्याचं सांगितलं. परंतु त्यांना कब्जा करता आला नसल्याचं त्यांनी आजतकशी बोलताना सांगितलं.
... तरच शांततेसाठी तयार
दरम्यान, एका फेसबुक पोस्टद्वारे नॉर्दन फ्रन्टचं नेतृत्व करणाऱ्या अहमद मसूद यांनी धार्मिक स्कॉलर्सकडून करण्यात येत असलेल्या शांततेच्या संदेशाचं स्वाग केलं. जर तालिबान आपल्या लोकांना पंजशीर आणि अंदराबमधून माघारी बोलवत असेल तर आपण शांततेसाठी तयार आहोत, असंही अहमद मसूद यांनी म्हटलं.
यापूर्वीही तालिबाननं पंजशीरच्या गव्हर्नर हाऊसवर कब्जा केल्याचा दावा केला होता. तसंच यानंतर तालिबांनींनी आनंद साजरा करत हवाई फायरिंग केलं होतं. यामध्ये अनेक लोकांचा जीव गेला होता. पंजशीरवर तालिबाननं कब्जा केल्याच्या दाव्याचं मसूद यांनी खंडन केलं होतं. पंजशीरवर आपलंच नियंत्रण असल्याचा दावा मसूद यांनी केला. तसंच ज्या दिवशी तालिबान पंजशीरवर ताबा मिळवेल तो आपल्या खोऱ्यातील अखेरचा दिवस असेल असंही ते म्हणाले होते.