एच-१बी व्हिसाच्या प्राधान्य प्रक्रियेला स्थगिती

By admin | Published: March 5, 2017 01:09 AM2017-03-05T01:09:03+5:302017-03-05T01:09:03+5:30

विशेष प्राधान्याने देण्यात येणाऱ्या एच-१बी व्हिसा चे ‘प्रीमियम प्रोसिसिंग’ ३ एप्रिलपासून काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे.

Suspension of the H-1B visa preference process | एच-१बी व्हिसाच्या प्राधान्य प्रक्रियेला स्थगिती

एच-१बी व्हिसाच्या प्राधान्य प्रक्रियेला स्थगिती

Next

वॉशिंगटन : विशेष प्राधान्याने देण्यात येणाऱ्या एच-१बी व्हिसा चे ‘प्रीमियम प्रोसिसिंग’ ३ एप्रिलपासून काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. या योजनेत काही कंपन्यांना प्राधान्याने व्हिसा मिळतो. त्यासाठी कंपन्यांना व्हिसा रांगेत यावे लागत नाही. हा व्हिसा भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांत विशेष लोकप्रिय आहे. या प्राधान्य प्रक्रियेलाच आता स्थगित देण्यात येत आहे.
अमेरिकेच्या नागरिकत्व आणि इमिग्रेशन सेवा विभागाने म्हटले की, १ आॅक्टोबरपासून २0१७ पासून सुरू होणाऱ्या २0१८ च्या आर्थिक वर्षासाठी ३ एप्रिलपासून अर्ज स्वीकारणे सुरू होईल. प्राधान्याने व्हिसाबाबत त्वरित निर्णय घेण्याची व्यवस्था काही काळासाठी स्थगित करण्यात येईल. ही स्थगिती सहा महिन्यांसाठी असू शकते. या काळात केवळ प्रलंबित व्हिसा अर्जांवर निर्णय घेण्यात येईल. (वृत्तसंस्था)


 

 

Web Title: Suspension of the H-1B visa preference process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.