पाकिस्तानकडून सस्पेन्स कायम
By admin | Published: July 6, 2015 11:13 PM2015-07-06T23:13:10+5:302015-07-06T23:13:10+5:30
पंतप्रधान नवाज शरीफ रशियातील शांघाई सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान महत्त्वपूर्ण द्विपक्षीय भेटीगाठी घेतील, असे पाकिस्तानने सोमवारी सांगितले;
इस्लामाबाद : पंतप्रधान नवाज शरीफ रशियातील शांघाई सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान महत्त्वपूर्ण द्विपक्षीय भेटीगाठी घेतील, असे पाकिस्तानने सोमवारी सांगितले; मात्र शरीफ भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील वा नाही याचा सस्पेन्स कायम ठेवला.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शरीफ उफात एसीओ शिखर परिषदेखेरीज काही महत्त्वपूर्ण द्विपक्षीय भेटीगाठीही घेणार असल्याचा या निवेदनात उल्लेख आहे; मात्र शरीफ कोणकोणत्या नेत्यांची भेट घेणार आहेत हे यामध्ये स्पष्ट करण्यात आलेले नाही. शरीफ आणि मोदी यांची भेट होण्याची शक्यता असल्याचे एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. (वृत्तसंस्था)