'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 10:22 PM2024-09-16T22:22:08+5:302024-09-16T22:23:39+5:30
एएफपीच्या वृत्तानुसार, स्थलांतर मंत्री जोहान फोर्सेल यांनी म्हटले आहे की, "जे स्थलांतरित 2026 नंतर, स्वेच्छेने आपल्या देशात परततील, ते 350000 स्वीडिश क्रोनर ($ 34,000) मिळण्यास पात्र असतील."
स्वीडनने स्थलांतरीत नागरिकांना देश सोडण्यास सांगितले आहे. पाकिस्तानी एक्सपर्ट कमर चीमा यांच्या मते, प्रामुख्याने मुस्लिम स्थलांतरितांना देश सोडण्यासाठी 34 हजार डॉलर्स दिले जातील, असे सांगण्यात आले आहे. खरे तर, स्वेच्छेने आपल्या देशात निघून जाणाऱ्या स्थलांतरितांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक प्रोत्साहनात मोठी वाढ करणार असल्याची घोषणा स्वीडनने केली आहे.
हा नवा उपक्रम 2026 मध्ये सुरू होईल आणि स्थलांतरितांना 350000 स्वीडिश क्रोनर (अंदाजे ₹28.7 लाख) पर्यंतची आर्थिक मदत केली जाईल. अधिकाधिक स्थलांतरितांनी आपल्या देशात निघून जावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अफगाणिस्तानपासून ते इराणपर्यंतच्या स्थलांतरितांचे आव्हान -
एएफपीच्या वृत्तानुसार, स्थलांतर मंत्री जोहान फोर्सेल यांनी म्हटले आहे की, "जे स्थलांतरित 2026 नंतर, स्वेच्छेने आपल्या देशात परततील, ते 350000 स्वीडिश क्रोनर ($ 34,000) मिळण्यास पात्र असतील." या देशाने 1990 च्या दशकापासून पूर्व युगोस्लाव्हिया, सीरिया, अफगाणिस्तान, सोमालिया, इराण आणि इराकसारख्या संघर्ष-ग्रस्त देशांतील स्थलांतरितांचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले आहे. मात्र आता, स्वीडनला आपल्या समाजात स्थलांतरितांना एकत्रित करण्यात सातत्याने आव्हानांचा सामना करावा लागत आहे, असे बोलले जात आहे.
काय म्हणाले पाकिस्तानी कमर चीमा ? -
पाकिस्तानी एक्सपर्ट कमर चीमा म्हणाले, “मुस्लिम स्थलांतरितांनी स्वीडनमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण केली आहे. सीरिया, अफगाणिस्तान, इराक आणि इराणमधून तेथे पोहोचलेल्या मुस्लिम स्थलांतरितांनी तेथे मोठ्या समस्या निर्माण केल्या आहेत. जर्मनीने त्यांची सीमा सील करण्यास सांगितले आहे. काही लोक तर असेही बोलत आहेत की, हे लोक 34 हजार डॉलर घेतील आणि पुन्हा परत येतील. मुस्लिमांनी या लोकांसोबत चुकीचे केले आहे. तेथे जाऊन घाण पसरवली. हे लोकांनी केवळ स्वीडनमध्येच असे केले, असे नाही. तर हे लोक जिथे जातात तिथे असेच वागतात.”