स्वीडन पेटले; धर्मग्रंथाचा अपमान झाल्याने मध्यरात्री दंगे भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 07:41 PM2020-08-29T19:41:16+5:302020-08-29T19:42:36+5:30
स्वीडिश वृत्तपत्र आफटोनब्लेटच्या अहवालानुसार स्वीडनचा राष्ट्रवादी पक्ष स्ट्रैम कुर्सचे नेता रॅसमस पालुदन यांना गुरुवारी माल्मो शहरातील 'नॉर्डिक देशों में इस्लामीकरण' वर आयोजित एका सेमिनारमध्ये भाग घ्यायचा होता. मात्र, स्थानिक प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था लक्षात घेवून पालुदन यांच्या सहभागास परवानगी नाकारली होती.
य़ुरोपमधील सर्वात शांत देशांमध्ये गणल्या जाणाऱ्या स्वीडनमध्ये शुक्रवारी रात्री एका धर्मग्रंथांचा अपमान झाल्याच्या आरोपावरून दंगे भडकले आहेत. मोठ्या संख्येने लोक माल्मोच्या रस्त्यावर उतरले आणि पोलिसांवरही दगडफेक केली. यावेळी आदोलकांनी रस्त्याशेजारी भभी असलेली शेकडो वाहनांना आग लावली. आंदोलक हिंसक झाल्यावर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
स्वीडिश वृत्तपत्र आफटोनब्लेटच्या अहवालानुसार स्वीडनचा राष्ट्रवादी पक्ष स्ट्रैम कुर्सचे नेता रॅसमस पालुदन यांना गुरुवारी माल्मो शहरातील 'नॉर्डिक देशों में इस्लामीकरण' वर आयोजित एका सेमिनारमध्ये भाग घ्यायचा होता. मात्र, स्थानिक प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था लक्षात घेवून पालुदन यांच्या सहभागास परवानगी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी शहरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर शुक्रवारी त्यांच्या समर्थकांनी माल्मो शहरात धर्मग्रंथांची काही पुस्तके जाळली होती.
उत्तर युरोपकडील देशांनी नार्डिक देश म्हटले जाते. हा भूगोलचा एक शब्द आहे. यामध्ये डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, आइसलँड आणि ग्रीनलँड हे देश येतात. या देशांची लोकसंख्याही खूप कमी आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून जगभरात सुरु असलेल्या इस्लामिक देशांमधील हिंसेंमुळे लाखो लोकांनी या देशांमध्ये शरण मिळविली आहे. एकट्या पोलंडने या शरणार्थींना झिडकारले आहे. यामुळे तेथील स्थानिक लोकांनी सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालल्याचा आरोप केला आहे.
रैसमस पालुदन हे पेशाने वकील आहेत. तसेच तेथील राष्ट्रवादी पक्ष स्ट्रैम कुर्सचे मोठे नेते आहेत. त्यांनी 2017 मध्ये या पक्षाची स्थापना केली होती. अनेक व्हिडीओंमध्ये त्यांनी मुस्लिमविरोधी भुमिका मांडली आहे. शुक्रवारी त्यांना स्वीडनमधून हद्दपार करण्यात आले असून दोन वर्षांसाठी प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.