Swiss Bank: जगभरात मोठी खळबळ! स्विस बँकेतील १८ हजार खात्यांचा डेटा लिक, १६० पत्रकारांनी केली छाननी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 02:19 PM2022-02-21T14:19:29+5:302022-02-21T14:20:34+5:30

Credit Suisse Data Leak: बर्फानं आच्छादलेलं सुंदर दृश्य, आलिशान कार आणि सर्वोत्तम चॉकलेट्स अशी स्वित्झर्लंडची ओळख आहे. पण यासोबतच हा देश सीक्रेट बँक सिस्टमसाठी देखील ओळखला जातो.

Swiss Bank: Excitement around the world! Data leaks from 18,000 Swiss bank accounts | Swiss Bank: जगभरात मोठी खळबळ! स्विस बँकेतील १८ हजार खात्यांचा डेटा लिक, १६० पत्रकारांनी केली छाननी

Swiss Bank: जगभरात मोठी खळबळ! स्विस बँकेतील १८ हजार खात्यांचा डेटा लिक, १६० पत्रकारांनी केली छाननी

Next

Credit Suisse Data Leak: बर्फानं आच्छादलेलं सुंदर दृश्य, आलिशान कार आणि सर्वोत्तम चॉकलेट्स अशी स्वित्झर्लंडची ओळख आहे. पण यासोबतच हा देश सीक्रेट बँक सिस्टमसाठी देखील ओळखला जातो. स्विस बँकेतील खातेधारकांची यादी नेहमीच चर्चेत असते. Credit Suisse नावाची बँकिंग सिस्टम सर्वात महत्वाच्या प्लेअर्सपैकी एक आहे. जगातील सर्वात महत्वपूर्ण आर्थिक संस्थांमध्ये याची गणना होते. या संस्थेला १६६ वर्षांचा इतिहास आहे. 

क्रेडिट सुइसमध्ये जवळपास ५० हजाराहून अधिक कर्मचारी काम करतात. तर बँकेच्या ग्राहकांची संख्या १५ लाख इतकी आहे. क्रेडिट सुइस स्वित्झर्लंडमधील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. याच बँकेच्या खातेधारकांची एक अशी यादी समोर आली आहे की ज्यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. 

खातेधारकांची यादी माध्यमांमध्ये लिक
स्विस बँकेतील जगभरातील दिग्गजांची खाती असल्याची माहिती अनेकदा समोर आली आहे. यादरम्यान जर्मनीतील एका वृत्तपत्र Süddeutsche Zeitung आणि Organized Crime and Corruption Reporting Project (OCCRP) च्या संयुक्त संशोधन अहवालातून अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. 

एका व्यक्तीनं १९४० सालापासून ते २०१० पर्यंतच्या खातेधारकांची महत्वाची माहिती जर्मनीच्या वृत्तपत्रासोबत कथित पद्धतीनं लिक केली आहे. याच पब्लिकेशननं न्यूयॉर्क टाइम्ससह ४६ इतर वृत्त माध्यमांच्या समूहांना देखील ही माहिती दिली आहे. यात परदेशी ग्राहकांच्या एकूण १८ हजार बँक खात्यांची माहिती यात देण्यात आली आहे. यामाध्यमातून स्विस बँकेशी निगडीत अनेक व्यवहारांची पोलखोल झाली आहे. 

१६० पत्रकारांनी केली छाननी
OCCRP च्या अहवालानुसार एकूण १६० पत्रकारांनी स्विस बँकेतील माहितीची अनेक महिने छाननी केल्यानंतर काही खळबळजनक माहिती समोर आली आहे. यात डझनभर भ्रष्ट राजकीय नेते, गुन्हेगार, गुप्तहेर, हुकूमशाह आणि इतर संशयितांच्या बँक खात्यांची माहिती मिळाली आहे. एकूण १८ हजार बँक खात्यांमध्ये एकूण मिळून ८ बिलियन डॉलर इतकी रक्कम जमा होती आणि बऱ्याच कालावधीपर्यंत ही सारी खाती सक्रिय देखील होती. 

Web Title: Swiss Bank: Excitement around the world! Data leaks from 18,000 Swiss bank accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.