स्वित्झर्लंडच्या नागरिकांना पगाराची नको 'गॅरंटी' !

By admin | Published: June 5, 2016 07:18 PM2016-06-05T19:18:02+5:302016-06-05T19:18:02+5:30

देशात राहणा-या नागरिकांना कोणतीही पूर्वअट न घालता दरमहा किमान उत्पन्न म्हणून 2500 स्वीस फ्रँकएवढी रक्कम देण्याचा प्रस्ताव स्वित्झर्लंडच्या नागरिकांनी धुडकावला आहे

Swiss citizens do not want to pay 'guarantees'! | स्वित्झर्लंडच्या नागरिकांना पगाराची नको 'गॅरंटी' !

स्वित्झर्लंडच्या नागरिकांना पगाराची नको 'गॅरंटी' !

Next

ऑनलाइन लोकमत

झ्युरिच, दि. 5- देशात राहणा-या नागरिकांना कोणतीही पूर्वअट न घालता दरमहा किमान उत्पन्न म्हणून 2500 स्वीस फ्रँकएवढी रक्कम देण्याचा प्रस्ताव स्वित्झर्लंडच्या नागरिकांनी धुडकावला आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. अशा प्रकारची कल्पना मांडून त्यावर सार्वमत घेतले जाण्याची जगातील ही पहिलीच वेळ होती.
या जनमतासाठी कौल देणारा व्यक्ती हा या देशाचा किमान पाच वर्षांपासूनचा रहिवासी असावा, अशी अट घालण्यात आली होती. विषमता आणि गरिबी याविरुद्ध लढण्यासाठी या माध्यमातून मदत मिळेल, असा उद्देश असल्याचं कारण स्वित्झर्लंड सरकारनं दिलं होतं. प्रत्येक व्यक्तीला दरमहा किमान उत्पन्न म्हणून 2500 स्वीस फ्रँक तर मुलांसाठी 625 फ्रँक एवढी रक्कम देण्याचा हा प्रस्ताव होता.
देशातील बहुतांश राजकीय पक्षांनी प्रस्तावाविरुद्ध मतदान करण्याच्या केलेल्या आवाहनालाही नागरिकांनी यावेळी योग्य प्रतिसाद दिला आहे. चार्ल्स या अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनी यावर भाष्य करताना म्हटले आहे की, जर तुम्ही काहीच न करता नागरिकांना रक्कम देणार असाल तर ते काहीच करणार नाहीत.

Web Title: Swiss citizens do not want to pay 'guarantees'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.