स्वित्झर्लॅंडच्या महिला सैनिकांना मोठा दिलासा, आता वापरावे लागणार नाही पुरूषांचे अंतर्वस्त्र....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 04:23 PM2021-03-31T16:23:36+5:302021-03-31T16:27:01+5:30
सध्या स्वित्झर्लॅंडच्या सेनेत एक टक्के महिलांचा समावेश आहे. येणाऱ्या २० वर्षात स्वित्झर्लॅंडच्या सेनेत महिला सैनिकांची संख्या १० टक्के करण्यावर भर दिला जात आहे.
स्वित्झर्लॅंडच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला सैनिकांना मोठा दिलासा मिळाल आहे. स्विस सेनेतील महिलांना आता पुरूषांचे अंर्तवस्त्र वापरण्यापासून मुक्ती मिळाली आहे. स्वित्झर्लॅंड सरकारने हा निर्णय तेव्हा घेतला जेव्हा ते सेनेत महिला सैनिकांच्या भरतीवर अधिक जोर देत आहेत. सध्या महिला सैनिकांना केवळ पुरूषांचे अंतर्वस्त्र दिले जातात. ज्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
बीबीसीच्या स्थानिक स्विस मीडियाच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. स्विस राष्ट्रीय परिषदेतील एक सदस्य मरिअन्न बिंदेर म्हणाले की, 'सेनेचे कपडे पुरूषांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. पण जर सेना खरंच महिलांच्या अधिक भरतीवर जोर देत असेल तर योग्य ती पावले उचलली जातील'. ते म्हणाले की, महिलांचे कपडे त्यांन सेनेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करू शकतात.
आतापर्यंत स्वित्झर्लॅंडच्या सेनेत महिला सैनिकांना लूज फिटिंग असलेले अंडरविअर दिले जात होते. हे स्विस महिला सैनिकांसाठी फारच अडचणीचं आणि अवघड ठरत होतं. सेनेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात उन्हाळ्यात महिलांना शॉर्ट अंडरविअर आणि हिवाळ्यात लांब अंडरविअर दिले जातील. ते असंही म्हणाले की सध्याचे कपडे महिला सैनिकांसाठी जुने झाले आहेत.
सध्या स्वित्झर्लॅंडच्या सेनेत एक टक्के महिलांचा समावेश आहे. येणाऱ्या २० वर्षात स्वित्झर्लॅंडच्या सेनेत महिला सैनिकांची संख्या १० टक्के करण्यावर भर दिला जात आहे. देशाच्या संरक्षण मंत्री विओला अमहर्ड यांनी महिला सैनिकांसाठी वेगळ्या अंडरविअर तयार करण्याच्या योजनेचं स्वागत केलं आहे. २००४ पासून स्वित्झर्लॅंडमध्ये महिला आणि पुरूष सैनिक एकसारखी ड्युटी करत आहेत. एक महिला सैनिक म्हणाली की, नवीन अंडरविअर मिळाल्याने त्यांना जास्त वजन घेऊन उंच ठिकाणी चढण्यास सोपं होईल. तसेच अनेक अडचणीही दूर होतील.